*नेरळ : सुमित क्षीरसागर –* उरण येथील यशश्री शिंदे या तरूणीची दाऊद शेख या नराधमाने क्रूरपणे हत्या केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यासह रायगड जिल्ह्यात उमटत असताना, नेरळ शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माहिला संघटने कडून यशश्री शिंदे हिच्या विद्युण हत्त्येचा निषेध नोंदवत नेरळ पोलीस ठाण्यात तीचा मारेकरी दाऊद शेख याला ताबोडतोब फाशी दया अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.
रायगड जिल्हयातील उरण तालुक्यातील यशश्री शिंदे या तरूणीने लग्नाला विरोध केल्याने दाऊद शेख या नराधमाणे यशश्री या तरूणीची क्रूरतेने निर्घुण हत्या केल्याची घटना घडली आहे. तर यशश्री शिंदे या क्रूरतेने झालेल्या हत्येच्या घटनेचा संपूर्ण राज्यासह रायगड जिल्ह्यात निषेध व मुक मोर्चा काढून दाऊद शेख या नराधमाला फाशी देण्याची मागणी जोर धरत असताना, कर्जत तालुक्यातील नेरळ शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माहिला संघटनेच्या वत्तीने थशश्री शिंदेचा मारेकरी नराधम दाऊद शेख याला ताबोडतोब फाशी देण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन हे दि. ३१ जुलै रोजी नेरळ पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. तर आम्ही केलेल्या सदर निवेदनातील मागणी ही नेरळ पोलीस ठाण्याच्या मार्फत माहाराष्ट्र शासन यांच्या पर्यंत पोहचवण्याची विनंती ही नेरळ पोलीस ठाण्याला करण्यात आली आहे. यावेळी नेरळ शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माहिला संघटनेच्या सुमनताई लोंगले, माजी उप सभापती सुजता मनवे, प्रीती देसाई, कल्पना चव्हाण, अक्षदा उतेकर, राखी गुरव, नीता हनुमंते, रेश्मा शिंदे, पूजा घोडबिंदे यांच्यासह आदी महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होत्या.