राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर शानदार विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वाल राजस्थानच्या विजयाचा नायक ठरला.
राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 38 व्या सामन्यात 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने राजस्थानला विजयासाठी 180 धावांचं आव्हान दिलं होतं. राजस्थानने हे आव्हान 1 विकेट्स गमावून 18.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. राजस्थानने 1 विकेट गमावून 183 धावा केल्या. शतकवीर यशस्वी जयस्वाल राजस्थानच्या विजयाचा हिरो ठरला. राजस्थानचा हा सातवा विजय तर मुंबईचा हा पाचवा पराभव ठरला.
राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल याने सर्वाधिक नाबाद शतकी खेळी केली. यशस्वीचं आयपीएलच्या कारकीर्दीतील आणि मुंबई विरुद्धचं दुसरं शतक ठरलं. यशस्वीने 60 बॉलमध्ये 9 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 173.33 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 104 धावा केल्या. कॅप्टन संजू सॅमसनने 28 बॉलमध्ये नाबाद 38 धावा केल्या. तर जॉस बटलर 25 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. मुंबईकडून पीयूष चावला याने एकमेव विकेट घेतली.
मुंबईची बॅटिंग….
दरम्यान त्याआधी मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 179 धावा केल्या. मुंबईच्या टॉप ऑर्डरने सपशेल निराशा केली. रोहित शर्मा 6, ईशान किशन 0 आणि सूर्यकुमार यादव 10 धावांवर आऊट झाले. त्यांनतर मोहम्मद नबीने काही वेळ टिकून बॅटिंग केली. मात्र त्यानंतर तो ही 23 धावा करुन माघारी परतला. मुंबईची स्थितीत 4 बाद 52 अशी झाली.
त्यानंतर तिलक वर्मा आणि नेहल वढेरा या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे मुंबईच्या डावाला बूस्टर मिळाला. त्यानंतर नेहल वढेरा 49 धावा करुन आऊट झाला. नेहलनंतर मुंबईने गुच्छ्यात विकेट्स गमावल्या. कॅप्टन हार्दिक पंड्या 10 धावा करुन माघारी परतला. तर तिलक वर्मा याने सर्वाधिक 65 धावा केल्या. तर गेराल्ड कोएत्झी याला भोपळाही फोडता आला नाही. तर पीयूष चावला 1 आणि जसप्रीत बुमराह 2 धावा करुन नाबाद परतले. राजस्थानकडून संदीप शर्मा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर ट्रेन्ट बोल्ट याने 2 विकेट्स मिळवल्या. तर आवेश खान आणि युझवेंद्र चहल या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.
▪️राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा आणि युझवेंद्र चहल.
▪️मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह.