सीरिया एकेकाळी मध्यपूर्वेतील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र मानलं जात होतं. परंतु हे शहर आज गृहयुद्ध आणि राजकीय संघर्षांच्या शोकांतिकेचं प्रतीक बनलं आहे.
सीरिया एकेकाळी मध्यपूर्वेतील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र मानलं जात होतं. परंतु हे शहर आज गृहयुद्ध आणि राजकीय संघर्षांच्या शोकांतिकेचं प्रतीक बनलं आहे.
गातील सर्वात जुने व ऐतिहासिक शहर असलेले सिरियातील अलेप्पो शहर सध्या गृह युद्धांमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सीरियातील विरोधी बंडखोर गटांनी अलीकडेच अलेप्पोवर भीषण हल्ला केला असून हे शहर सरकारी नियंत्रणातून ताब्यात घेतले. सिरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांचे लष्कर या हल्ल्याला तोंड देऊ शकले नाही. त्यामुळे बंडखोरांनी अलेप्पोवर सहज ताबा मिळवला, हा हल्ला दोन दिशांनी करण्यात आला. बंडखोर गटांनी हामा प्रांत आणि इदलिबच्या आसपासच्या ग्रामीण भागातही आपले स्थान मजबूत केले आहे.
कोणत्या बंडखोर गटांनी हा हल्ला केला?…
हे हल्ले हयात तहरीर व अल-शाम (एचटीएस) या दहशतवादी संघटनेच्या गटाने केले असून या दोन्ही संघटनांना अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. हा गट पूर्वी अल कायदाचा एक घटक होता. परंतु २०१६ मध्ये हा गट अल-कायदापासून वेगळा झाला. याशिवाय नॅशनल कोलिशन ऑफ सिरियन रिव्होल्यूशन आणि अपोझिशन फोर्सेसने इदलिबच्या उत्तरेकडून आणखी एक हल्ला अलेप्पोवर करण्यात आला. या हल्ल्यात तुर्कीसमर्थित सीरियन नॅशनल आर्मी किंवा फ्री सीरियन आर्मीचाही समावेश आहे.
हा हल्ला आत्ताच का झाला?..
या हल्ल्याच्या वेळेमागे अनेक कारणे होती. लेबनॉनमध्ये नुकतीच झालेली शस्त्रसंधी : इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील शस्त्रसंधीमुळे बंडखोरांना आपली रणनीती अंमलात आणण्याची संधी मिळाली.
रशिया-युक्रेन युद्ध :
रशिया हा सीरियाच्या असद सरकारचा मुख्य समर्थक असून सध्या रशिया युक्रेन युद्धात गुंतला आहे. यामुळे बंडखोरांना आणखी एक संधी मिळाली.
*इराण आणि हिजबुल्लाहची कमकुवतता :*
इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणसमर्थित सैन्य आणि हिजबुल्लाह या संघटना देखील कमकुवत झाल्या आहेत. यामुळे बंडखोरांना मोठी संधी मिळाली आणि त्यांनी अलेप्पोवर हल्ले करण्यास सुरुवात केली.
अलेप्पो शहर ताब्यात असण्याचे काय आहे महत्त्व ?..
अलेप्पो हे सीरियातील दुसरे सर्वात मोठे शहर व ऐतिहासिक व्यापारी केंद्र आहे. बंडखोर आणि सरकारी दलांसाठी सामरिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून या शहराचा ताबा अत्यंत महत्त्वाचा आहे. २०१६ मध्ये रशियाच्या मदतीने असद सरकारने बंडखोरांकडून अलेप्पोतून हद्दपार केले होते. मात्र आता बंडखोरांनी या शहरावर पुन्हा ताबा मिळवला आहे. असद यांच्या सरकारसाठी हा मोठा धक्का आहे.
गृहयुद्धत कोणत्या देशांचा सहभाग ?..
सरकार समर्थक देश :
रशिया : असद सरकारचा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय समर्थक देश आहे.
इराण : इराणने नुकतेच शेकडो लढाऊ सैनिक सिरियात असद यांच्या मदतीसाठी पाठवले आहेत.
हिजबुल्लाह : उत्तर सीरियात सैन्य पाठवण्याची सध्या कोणतीही योजना नाही. पण हिजबुल्लाह हा असद सरकारचा समर्थक मानला जातो.
बंडखोर समर्थक देश..
तुर्कस्तान हा बंडखोर गटांना पाठिंबा देतो आणि वायव्य सीरियात तुर्कीने सैन्य तैनात केले आहे.
इतर देश: अमेरिकेचा कुर्दिशप्रणित सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस (एसडीएफ) ला पाठिंबा आहे.
इस्रायल हा प्रामुख्याने सीरिया, विशेषत: इराण आणि हिजबुल्लाहच्या तळांवर हवाई हल्ले करत आहे.
अलेप्पोवरील ताज्या घडामोडी सीरियातील यादवी युद्धाला कलाटणी देणारी ठरू शकतात. बंडखोरांना रोखण्यात सरकारला अपयश आल्यास सत्तासमीकरणात मोठा बदल होऊ शकतो. अमेरिका रशिया यांच्या हस्तक्षेपामुळे व सामरिक हितसंबंधांमुळे हा संघर्ष आणखी गुंतागुंतीचा झाला आहे.
सीरियाचे यादवी युद्ध : एक गुंतागुंतीचा आणि वेदनादायी इतिहास…
सीरिया एकेकाळी मध्यपूर्वेचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक केंद्र मानले जात होते, परंतु आज ते गृहयुद्धात अडकून पडले आहे. या युद्धाचा फटका केवळ या देशालाच नाही तर संपूर्ण जगाला बसला आहे. २०११ मध्ये सुरू झालेला हा संघर्ष आजही सुरू असून त्याचे बहुआयामी परिणाम होत आहेत.
हा संघर्ष कसा सुरू झाला?..
२०११ मध्ये जेव्हा ‘अरब स्प्रिंग’ने ट्युनिशिया, इजिप्त आणि लिबियामध्ये राजकीय बदल घडवून आणले, तेव्हा त्याचा परिणाम सीरियावरही झाला. लोकशाही, स्वातंत्र्य आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. हे आंदोलन सर्वप्रथम दक्षिणेकडील दारा शहरात दिसून आले, जिथे भिंतीवर सरकारविरोधी घोषणा लिहिल्याबद्दल काही मुलांना अटक करण्यात आली आणि त्यांचा छळ करण्यात आला. या मुलांच्या अटकेविरोधात शांततेत निदर्शने झाली, पण सरकारच्या हिंसक प्रतिक्रियेमुळे हे आंदोलन आणखी चिघळले. हे आंदोलन देशभर पसरले आणि लोकशाहीच्या मागणीचे राजकीय उठावात रूपांतर झाले.