जागतिक पुस्तक दिन दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जातो. २३ एप्रिल हा जगप्रसिध्द साहित्यिक शेक्सपिअरचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही आहे. त्यांच्या स्मरणार्थ संपूर्ण जगात हा दिवस ‘पुस्तक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
युनेस्को आणि त्यासंबंधित संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विल्यम शेक्सपियर, मिगुएल सर्व्हांटिस आणि इंका गार्सिलोसो यांच्यासह जगातील ख्यातनाम व्यक्तींचा या दिवशी मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, युनेस्कोने २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले. हा दिवस पहिल्यांदा २३ एप्रिल १९२३ रोजी स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता. हा दिवस जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये विविध पद्धतींनी साजरा केला जातो.
जागतिक पुस्तक दिवसाच्या निमित्ताने भारतीय साहित्यातील सर्वोच्च मानला जाणारा ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराबद्दल जाणून घेऊया
भारतीय साहित्य सृष्टीतला पहिला मनाचा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा १९६५ साली देण्यात आला. त्या वेळी १९२० ते १९५८ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याचा विचार करण्यात आला होता. प्रसिद्ध मल्याळी महाकवी गोविंद शंकर कुरूप यांना त्यांच्या ‘ओडोक्वुफल’ (वेळूची बासरी) या महाकाव्यासाठी प्रदान करण्यात आला होता. सर्वाधिक म्हणजे दहा वेळा हिंदी भाषेतील साहित्याला ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तर कन्नड भाषेला आठ वेळा, आणि मराठी भाषेला चार वेळा सन्मानित करण्यात आले आहे.
सन १९७४ रोजी दहावा ज्ञानपीठ पुरस्कार मराठी भाषिक साहित्याने पटकावला. वि.स. खांडेकर म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर यांच्या ‘ययाति’ या कादंबरीला हा पुरस्कार देण्यात आला.
त्यानंतर तब्बल चौदा वर्षांनी वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर जे कुसुमाग्रज या नावाने कविता लिहीत त्यांच्या ‘नटसम्राट’ या कादंबरीसाठी मिळाला.
तर २००३ रोजी विंदा करंदीकरांना म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर यांना त्यांच्या ‘अष्टदर्शने’साठी
तर २०१४ रोजी भालचंद्र नेमाडे यांना त्यांच्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ या कादंबरीसाठी ज्ञानपीठ देण्यात आला.