नवी दिल्ली- संसदेचे दोन्ही सभागृहात महिला आरक्षण विधेयक बहूमताने मंजूर करण्यात आलं. यानंतर देशभरातून याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यादरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. PM मोदी यांचं शुक्रवारी सकाळी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात महिला आघाडीच्यावतीनं भव्य स्वागत करत सत्कार करण्यात आला. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील महिलांना महिली अरक्षण विधेयक मंजूर झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, येणाऱ्या अनेक पिढ्या या निर्णयाची चर्चा करतील. यावेळी मी संपूर्ण देशाला नारीशक्ती वंदन अधिनियम संसदेच्या दोन्ही सभागृहात मोठ्या बहुमताने मंजूर झल्याबद्दल शुभेच्छा देतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर वरिष्ठ सहकारी आणि देशातील महिलांना देखील मी प्रणाम करतो.
कधी-कधी एखाद्या निर्णयात देशाचे भाग्य बदलण्याची क्षणता असते आण आज आपण सर्वजण अशाच एका निर्णयाचे साक्षिदार बनलो आहोत. संसदेच्या दोन्ही सभागृहात नारीशक्ती वंदन अधिनियम रेकॉर्ड मतांनी मंजूर करण्यात आले. ज्या गोष्टीचा देशाला मागील अनेक दशाकांपासून प्रतिक्षा होती, ते स्वप्न आता पूर्ण झालं आहे. हा संपूर्ण देशासाठी महत्वाचा प्रसंग आहे. आज प्रत्येक महिलेचा आत्मविश्वास वाढला आहे. आज महिला आनंद व्यक्त करत आहेत. कोटी-कोटी महिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं सौभाग्य भाजप पक्षाला मिळालं, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
नारीशक्ती वंदन अधिनियम हा काही साधारण कायदा नाहीये, हा नव्या भारताचा नव्या लोकशाही प्रतिबद्धतेची पूर्तता आहे, हे अमृतकाळात सर्वांच्या प्रयत्नातून विकसीत भारताच्या निर्माणाकडे खूप मोठं पाऊल आहे. महिलांच्या जीवनाचा स्तर उंचवण्यासाठी महिलांच्या माध्यमातून विकासाचं नवं युग देशात आणण्याची गॅरंटी मोदींने दिली होती हे त्याचं प्रत्यक्ष उदाहण आहे. देशातील प्रत्येक माता, मुली आणि बहिणी यांना हा नारीशक्ती वंदन अधिनियम मंजूर झाल्याबद्दल खूप शुभेच्छा देतो असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.लोकशाहीत महिलांसाठी या कायद्यामुळे भाजप महिलांची भागीदीरी वाढवण्यासाठी तीन दशकांपासून प्रयत्न करत होती आणि आम्ही ते पूर्ण केलं आहे असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी लोकसभेत मंगळवारी संमत झालेल्या ‘नारीशक्ती वंदन विधेयक २०२३’ ला राज्यसभेतur सर्वसहमतीने मंजुरी देण्यात आली. विधेयकाच्या बाजूने २१५, तर विरोधात शून्य मते पडली. यामुळे महिलांना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.