मुंबई: शासनाने एसटी बसेसमधून यापुढे सरसकट सर्व महिलांना अर्धे तिकीट आकारण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती.त्याबाबत महामंडळाने गुरुवारी रात्री सर्व विभाग नियंत्रकांना सूचना केली. त्यामुळे महिलांना आजपासून (१७ मार्च) एसटीत निम्या तिकिटात एसटीचा प्रवास करता येणार आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीमधून मोफत प्रवास करणाऱ्या योजनेचे उद्घाटन २५ ऑगस्ट२०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.त्यातच आता एसटीत महिलांना १७ मार्चपासून निम्या भाड्यात प्रवास करता येणार आहे. त्यामुळे एसटीत महिला प्रवासी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसटी मंडळाच्या दररोज चालविण्यात येणाऱ्या सोळा हजार फेऱ्यांद्वारे रोज लक्षावधी महिलांना लाभ होईल.