युके- मधुस्मिता जेना दास ही महिला ४१ वर्षांची असून सध्या ती भलतीच चर्चेत आहे.
आपण कुठेही गेलो तरी आपली संस्कृती जपली पाहिजे. आपले भारतीय पदार्थ, सण-उत्सव, आपला पोशाख यातून आपण आपल्या संस्कृतीचं जतन करु शकतो. इतकंच काय तर कोणत्याही प्रसंगी आपल्या संस्कृतीचं प्रदर्शन करता येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटनमधील भारतीय महिला, जी साडी नेसून मॅरेथॉन Marathon मध्ये धावली आणि आता ती चर्चेत आहे.
मधुस्मिता जेना दास ही महिला ४१ वर्षांची असून सध्या ती भलतीच चर्चेत आहे. युकेमध्ये झालेल्या Manchester Marathon 2023 मध्ये ही भारतीय वंशाची महिला संबलपुरी साडी नेसून धावली. @dashman207 या ट्विटर वापरकर्त्याने तिचा एक फोटो शेअर करा आहे.
त्याने ट्विटमध्ये म्हटलं की “An Odia living in Manchester, UK ran the UK’s second largest Manchester Marathon 2023 wearing a Sambalpuri Saree !
तसेच फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटल स्कूल या ट्विटर हॅंडलवरुन तिचा धावतानाचा व्हिडिओ सामायिक करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही ४१ वर्षीय महिला साडी नेसून Marathon मध्ये सहज धावत आहे. तिला धावताना कसलाच त्रास होत नाही किंवा साडीची अडचण देखील येत नाही. विशेष म्हणजे मधुस्मिताने जगभरातील अनेक मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आहे. ती भारतीय संस्कृती जपते म्हणून लोकांना तिचा अभिमान वाटतो असा प्रकारचे अनेक कमेंट्स आले आहेत.