
जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | ऑक्टोबर ०८, २०२३.
संगमेश्वर तालुक्यातील प्रथितयश बांधकाम व्यावसायिक श्री. सुखदेव जाधव यांच्या पत्नी व देवरुख पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्त्या तसेच भाजपा महिला मोर्चा संगमेश्वरच्या माजी तालुकाध्यक्षा सौ. संगीताताई जाधव यांची भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती झाली असून याबद्दल त्यांच्यावर विविध माध्यमांतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
सह्याद्री नगर येथील महिलांनी त्यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभकामना व्यक्त करताना तुमच्यासोबत प्रत्येक ठिकाणी असण्याचे अभिवचन दिले आहे. आमच्यातली एक महिला भारतीय जनता पार्टीसारख्या एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीमध्ये असल्याचा आम्हा सर्वांना अभिमान असल्याचे महिलांनी सांगितले. यावर बोलताना सौ. जाधव म्हणाल्या, “आपल्या सर्वांच्या सदिच्छा कायम अशाच माझ्यासोबत राहोत. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. जिल्हाध्यक्ष मा. श्री. राजेशभाई सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.”