
सौ. संंगिताताई जाधव यांच्यावर होतोय अभिनंदनाचा वर्षाव; सह्याद्रीनगरमधील महिलांनीदेखील सौ. संंगिताताई जाधव यांचे केले अभिनंदन
जनशक्तीचा दबाव ,प्रतिनिधी देवरूख- संंगमेश्वर तालुक्यातील साडवली सह्याद्रीनगर महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. संंगिताताई सुखदेव जाधव यांची भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सह्याद्रीनगरमधील महिलांनीदेखील सौ. संगिताताई जाधव यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करून त्यांचे मनपुर्वक अभिनंदन केले आहे.
सौ. संंगिताताई जाधव या तालुक्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री. सुखदेव जाधव यांच्या पत्नी आहेत. पती सुखदेव जाधव यांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावरच त्या राजकारणात यशाची शिखरे गाठत आहेत. भाजपच्या संगमेश्वर तालुकाध्यक्षपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळल्यानंतर सौ. संंगिताताई जाधव यांची आता जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी आणखीनच वाढली आहे. परंतु मुळातच पक्षाने दिलेली जबाबदारी ही संधी मानून पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करणे ही धारणा सौ. संगिताताई यांची असल्यामुळे त्या राजकारणात यशस्वीपणे वाटचाल करीत आहेत.
त्यांची भाजपच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल साडवली सह्याद्रीनगरमधील महिलांनी काल शनिवारी त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांचा यथोचित सत्कार केला. त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. आमच्या सोबत असणारी एक महिला भाजपसारख्या एका राष्ट्रीय पक्षाची जिल्हा सरचिटणीस होणे ही आम्हा महिलांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरवोद्गारही या महिलांनी यावेळी काढले. तर सह्याद्रीनगरमधील महिलांनी आपला सत्कार करून जे अभिनंदन केले आहे. त्याने आपण भारावून गेल्याचे सांगत असेच तुमचे प्रेम माझ्या पाठीशी कायम असू द्या, अशी अपेक्षा सौ. संंगिताताई जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.