
मुंबई – कोकण रेल्वेचा काही मार्ग हा एकेरी असून सध्या दुपदरीकरणाच्या संपूर्ण कामासाठी 5,100 कोटींचा खर्च अपेक्षित असून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या मदतीशिवाय काम होणार नाही, अशी माहिती ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’चे (केआरसीएल) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी दिली आहे.
त्यांनी पुढे सांगितले की, कोकण रेल्वेवरील 11 स्थानकांचा विकास करण्यात येणार असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 99 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तो खर्च झाला आहे. सध्यस्थितीत कोकण रेल्वेवर 2,750 कोटींचे कर्ज असून यंदाच्या आर्थिक वर्षात त्यापैकी 600 कोटींचे कर्ज फेडले जाईल. कोकण रेल्वेही कोरोनाच्या दोन वर्षाचा अपवाद वगळता नेहमीच नफ्यात राहिली आहे. कोकण रेल्वेने 2023-24 साली 301 कोटींचा निव्वळ नफा कमावला. ’के आरसीएल’ ने गेल्या 15 वर्षांत 3,150 कोटींच्या निविदा काढल्या असून जवळपास 4, कोटींचे कामे सुरू आहेत, असे यांनी सांगितले.