
दिवा (प्रतिनिधी) दिव्यात दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रभु श्रीराम यांच्या जन्मदिनानिमीत्त उत्साहाचे वातावरण दिसून आले असून परिसर भगवायम झाले होते.दिव्यातील साबेगाव येथून सुरु झालेल्या पारंपारिक वेशभुषा आणि पदायात्रेत नागरिकांचा उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिसून आला.यात श्रीराम भक्त महाबळी हनुमान यांच्या वेशभुषेने अनेकांचे लक्ष वेधले.साबेगाव,दिवा चौक,गणेशनगर येथून पदयात्रा काढत मुंब्रा काँलनी येथे अखेरीस जमलेल्या महाआरतीला नागरिकांची अलोट गर्दी पहावयास मिळाली.

श्री राम नवमीनिमीत्त दिव्यात भारतीय जनता पार्टीच्यावतीने भव्य असे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या पदयात्रेत ठाणे जिल्हाअध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थितीही होती.दिवा शहर भाजपाचे मंडळअध्यक्ष श्री रोहीदास मुंडे,महिला अध्यक्षा ज्योतीताई पाटील,ठाणे शहर कार्यकारिणी सदस्य अशोक पाटील,जागो हो दिवेकरचे प्रणेते श्री विजय भोईर,ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री नरेश पवार,ओबीसी सेल उपाध्यक्ष श्री विनोद भगत,युवराज यादव,विरेंद्र गुप्ता,नागेश पवार,प्रशांत आंबोनकर,राहूल साहू,गणेश गुप्ता,बैद्यनाथ पाडी,समीर चव्हाण यांनी आदी पदाधिकारीही उपस्थित होते.
यावेळी दिवा शहरातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.रॅलीत राम,लक्ष्मण,सिता आणि बाहुबली हनुमान यांच्या वेशभुषेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते.या रॅलीत दिव्यातील वातावरण भगवामय झाल्याचे दिसून आले.या रॅलीत भारतीय जनता पार्टीचे स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता.
महाआरतील प्रचंड उत्साह
काल दिवसभरात श्रीराम नवमीचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते.दिव्यातील समाजसेवक श्री.रोशन भगत आणि आदर्श मित्रमंडळाच्या अध्यक्षा सौ.सपना भगत यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.हे शिबीर ऐन श्रीरामांच्या उत्सवात दिवसभरात लक्षवेधी ठरले होते.अनेक गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.मात्र सायंकाळी या ठिकाणी पार पडलेल्या महाआरतील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.अनेक महिला आरत्या घेवून महापूजेला हजर होत्या.