शुभेच्छा देण्याकरिता लागल्या होत्या रांगा…
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व सिंधूरत्न योजना समिती सदस्य भैया सामंत यांच्याकडून शुभेच्छा !!!…
संगमेश्वर- संगमेश्वरचे मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातील अनेकांनी त्यांच्यावर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव केला.
आमदार शेखर निकम यांना वाढदिवसानिमित्त सावर्डे येथील संपर्क कार्यालय येथे अभिष्टचिंतन कार्यक्रमा दरम्यान सायंकाळी उशिरा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, तसेच सिंधुरत्न योजनेचे सदस्य किरण उर्फ भैया सामंत, उद्योजक पिंट्या पाकळे, केतन पवार यांनी शुभेच्छा दिल्या.
दिवसभर राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.
रात्री शुभेच्छा देण्याकरिता मोठी रांग पाहायला मिळाली.
दिवसभर शुभेच्छा देण्याकरिता उसळलेली गर्दी पाहता ही विधान सभा निवडणुकीतील विजयाची पोहच पावतीच म्हणावी लागेल.