ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर्स हिरवे कपडे का घालतात? १०० वर्ष जुनी आहे ही पद्धत…..

Spread the love

*1. आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्यात एकदा तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली असेलच. त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच जाणवली असेल की, डॉक्टर मंडळी सफेद रंगाचा अॅप्रन (कोट) घालतात आणि गळ्यात स्टेथस्कोप असतो.

*2. पांढरा कोट घालणारे हे डॉक्टर किंवा सर्जन मंडळी शस्त्रक्रियेपूर्वी म्हणजेच ऑपरेशनपू्र्वी मात्र हिरवे कपडे परिधान करतात हे देखील आपण सर्वांनी नक्कीच पाहिले असेल. तुमच्या पैकी किती जणांनी असा विचार केला आहे की हे लोक ऑपरेशनसाठी फक्त हिरव्याच रंगाचा कोट किंवा कपडे का परिधान करत असतील.

*3. डॉक्टर मंडळींना कोणत्याही प्रकारचे कपडे घालून हॉस्पिटलमध्ये येण्याची मुभा असते. असे असतानाही, ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना सर्व सर्जन किंवा इतर सहकारी हिरवा रंग सोडून इतर कोणताही रंग का परिधान करत नाहीत? यामागे वैज्ञानिक कारण काय असू शकते? चला तर मग… याबद्दल जाणून घेऊया.

*4. डॉक्टर हिरवे कपडे का घालतात?- तुमच्या लक्षात आले असेल की जेव्हा तुम्ही एका अंधाऱ्या खोलीत प्रकाशमय ठिकाणाहून प्रवेश करता आणि हिरव्या किंवा निळ्या रंगाच्या संपर्कात असता तेव्हा तुम्हाला बरे वाटते.

*5. ऑपरेशन रूममध्ये डॉक्टरही याच गोष्टीचा अनुभव घेत असतात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एका सोशल मीडिया यूजरने ऑनलाइन प्लॅटफॉर्म Quora वर दिली आहेत. त्या व्यक्तीने इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे.

*6. डॉक्टर असे कपडे का घालतात?- त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, हिरवा आणि निळा हे प्रकाशाच्या स्पेक्ट्रमवर लाल रंगाच्या विरुद्ध आहेत आणि ऑपरेशन दरम्यान, सर्जनचे लक्ष मुख्यतः लाल रंगावर असते. कापडाचा हिरवा आणि निळा रंग केवळ सर्जनची दृष्टीच वाढवत नाही तर लाल रंगासाठी त्याला अधिक संवेदनशील बनवते.

*7. एका अहवालानुसार, हिरवे कापड शस्त्रक्रियेदरम्यान डोळ्यांना थोडा आराम देते. बीएलके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल दिल्ली येथे कार्यरत ऑन्कोलॉजिस्ट डॉ. दीपक नैन यांनी आयुर्वेदातील शस्त्रक्रियेदरम्यान हिरव्या रंगाच्या वापराविषयी लिहिले आहे. याचे कोणतेही स्पष्ट असे स्पष्टीकरण नाही, पण याचा उल्लेख करण्यात आला आहे.

*8. हिरव्या रंगाच्या वापराला १०० वर्षांपेक्षा जास्तीचा इतिहास- शस्त्रक्रिया करताना काही ठिकाणी डॉक्टर निळे आणि पांढरे कपडेही घालतात. पण हिरव्या रंगाला प्राधान्य दिले जाते कारण त्यावर लाल रक्ताचे डाग चटकन दिसतात. डॉक्टरांनी गेल्या बऱ्याच काळापासून निळा किंवा हिरवा पोशाख परिधान करण्यास सुरूवात केली आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की ते सुरूवातीपासून नेहमीच असे करत आले आहेत.

*9. पूर्वीच्या काळी, डॉक्टर आणि सर्व रुग्णालयातील कर्मचारी पांढरा पोशाख घालत असत, परंतु १९१४ मध्ये डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी हिरवे कपडे घालण्याची पद्धत सुरू झाली. तेव्हापासून हा पोशाख लोकप्रिय झाला. आजकाल काही डॉक्टर निळे कपडेही परिधान करताना दिसतात, पण तरीही बहुतांश ठिकाणी हिरव्या रंगालाच प्राधान्य दिले जाते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page