
आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल?, जाणून घ्या आजच्या राशीभविष्यात.
*मेष (ARIES) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज आपण एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. व्यापार-व्यवसायात सावध राहावे लागेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. संततीच्या बाबतीत मात्र आपली द्विधा मनःस्थिती होईल.
*वृषभ (TAURUS) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने होईल. नवीन ओळखी होतील. एखाद्या सहलीचं आयोजन यशस्वीपणे करू शकाल. परंतु दुपारनंतर वाद होण्याची शक्यता असल्यानं बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. गूढ विषयांची आवड निर्माण होईल.
*मिथुन (GEMINI) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतात. दुपारनंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. मित्रांसह हिंडण्या – फिरण्याची व प्रेक्षणीय स्थळी जाण्याची संधी मिळेल. समाजात मान-सन्मान प्राप्त झाल्याने मन आनंदित होईल.
*कर्क (CANCER) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळं कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात शांतता नांदेल. शारीरिक आणि मानसिकदृष्टया उत्साह आणि प्रसन्नतेचा अनुभव येईल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.
*सिंह (LEO) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज शारीरिक आणि मानसिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपारनंतर आर्थिक योजनावर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळं बौद्धिक चर्चा टाळणे हिताच राहील. नवे कार्य हाती घेण्यात अडचणी येतील. सट्टा- जुगारात नुकसान संभवते.
*कन्या (VIRGO) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आज आपण गूढ विद्येकडं आकर्षित व्हाल. आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. विरोधकांवर मात करू शकाल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक आणि शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईची तब्बेत बिघडेल. शक्यतो आज स्थावर संपत्तीचे व्यवहार करणे टाळावे.
*तूळ (LIBRA) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आज सकाळच्या प्रहरी प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबियांशी प्रेमाने वागावे लागेल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल. नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्ती होईल. एखादा प्रवास संभवतो. सहकार्यांशी संबंध चांगले राहतील.
*वृश्चिक (SCORPIO) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात आनंद आणि उत्साहाचं वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घ्या. दुपारनंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आपल्या बोलण्यानं किंवा कृतीनं कुटुंबीय दुखावतील व त्यामुळं कटुता निर्माण होईल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील.
*धनू (SAGITTARIUS) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळं आज आपली वाणी आणि संताप यावर नियंत्रण ठेवावं लागेल. शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्य राहील. आज शक्यतो शस्त्रक्रिये सारख्या बाबी टाळणे हिताच राहील. दुपारनंतर कामे यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपणाला लाभ होईल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.
*मकर (CAPRICORN) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्यानं व्यावसायिक आणि आर्थिकदृष्टया काही लाभ होतील. दुपारनंतर सावध राहावे लागेल. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळं वाहन जपून चालवा. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोरंजनासाठी खर्च होईल. संबंधितांशी मतभेद होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरीची कामे जपून करावीत.
*कुंभ (AQUARIUS) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आज आपला मान-सन्मान झाल्यानं काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. मित्रांसह सहलीला जाण्याचा बेत आखाल. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
*मीन (PISCES) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आजची सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळं समाधान वाटेल. प्रकृती उत्तम राहील.