ठाणे : निलेश घाग लोकसभा कुणी लढवायची, यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला कलगीतुरा रंगत आहे. भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेने या मतदार संघावरील दावा पक्का केला. शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांच्याकडून ठाणे,नवी मुंबई येथे बॅनरबाजी करण्यात आली. ठाणे लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या पारड्यात पडणार, याची उत्सुकता मतदारांना पडली आहे.
भाजपकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. भाजप हा ठाणे मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी अनेकांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते
लोकसभेसाठी नक्की कोणाची वर्णी लागणार
माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे बाजी मारणार?
आता नरेश म्हस्के यांच्या समर्थकांनी केवळ ठाण्यातच नव्हे तर नवी मुंबईतही बॅनरबाजी करून लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक संजीव नाईक यांच्यासह नाईक कुटुंबाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे आणि संजीव नाईक यांच्या नावांची लोकसभेसाठी चर्चा आहे.सेनेकडून आमदार प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के यांची नावे आघाडीवर आहेत. यात कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात