कर्नाटकात कोण होणार मुख्यमंत्री? सिद्धरामय्या कि डी. के. शिवकुमार?

Spread the love

निरीक्षकांच्या समितीने खर्गेंकडे सोपवला अहवाल; आजच फैसला होण्याची शक्यता

बंगळुरू- कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कर्नाटकात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी नेमलेल्या निरीक्षकांच्या समितीने आपला अहवाल मल्लीकार्जुन खर्गे यांच्याकडे सादर केला आहे. अध्यक्ष इतर राज्यांतील नेत्यांशी सल्लामसलत केल्यानंतर योग्य निर्णय घेतील अशी माहिती एआयसीसी कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी सांगितले आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर राज्याचा पुढील मुख्यमंत्री निवडण्यासाठी काँग्रेस पक्ष विचारमंथन करत आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेस नेते सिद्धरामय्या हायकमांडची भेट घेण्यासाठी सोमवारी दिल्लीत पोहोचले. सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे नवीन सरकार कसे असेल आणि मुख्यमंत्रिपदाची घोषणा कधी केली जाईल असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यांनी “थांबा आणि वाट बघूया… मला माहीत नाही…” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटकात नव्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेबाबत काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण आहे. कोण मुख्यमंत्री होणार हे अद्यापही स्पष्ट नाही. दरम्यान डीके शिवकुमार यांनी आपला सोमवारी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला. पोटात इन्फेक्शन झाले आहे, त्यामुळे दिल्लीला जाऊ शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच कर्नाटकसाठी हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल असेही ते म्हणाले.

काँग्रेसला 2018 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी मोठ्या प्रमाणात गटबाजीचा सामना करावा लगाला होता. त्यामुळे काँग्रेसला ही परिस्थिती हाताळण्याचा अनुभव असला तरी यावेळी काँग्रेसकडे गमावण्यासारखं बरंच काही आहे. कारण कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला भरभरून दिले आहे. आता जनतेला लोकप्रिय मुख्यमंत्री देण्याची जबाबदारी काँग्रेसवर आली आहे. काँग्रेसने निवडणुकीत दिलेल पाच अश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारी नव्या मुख्यमंत्र्यांवर असणार आहे. त्यामुळे त्याला हे अश्वासनं लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडला मुख्यमंत्रिपदासाठी आणि उपमुख्यमंत्रिपदासाठी असा चेहरा हवा आहे जो सर्व राजकीय समीकरणे व्यवस्थित हाताळू शकेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page