इंडिया टुडे आणि सी वोटरचा मूड ऑफ दि नेशन हा सर्वे जाहीर झाला असून यानुसार, आता निवडणुका झाल्यातर एनडीए सरकार सत्तेवर येईल. मात्र, मागच्या वेळेपेक्षा यंदा कमी जागा त्यांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू झाली असून सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीए पुन्हा सत्ता स्थापन करणार की नव्याने निर्माण झालेल्या इंडिया आघाडीला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, इंडिया टुडे आणि सी वोटरचा मूड ऑफ the नेशन हा सर्वे जाहीर झाला असून यानुसार, आता निवडणुका झाल्यातर एनडीए सरकार सत्तेवर येईल. मात्र, मागच्या वेळेपेक्षा यंदा कमी जागा त्यांना मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी म्हणून काही राष्ट्रीय नेत्यांना जनतेने पसंत केलं असल्याचंही या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात