कपिलराज तीन वर्षांपूर्वी दिल्लीत आले होते. त्यांना संयुक्त निर्देशक या पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच त्यांना झारखंड दिल्लीतील चौकशीची जबाबदारी देण्यात आली. या दरम्यान त्यांनी पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणाची चौकशी केली.
अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांना अटक करणारे ED चे अधिकारी कपिल राज कोण आहेत?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीने अटक केली. आता ते २८ मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चर्चेत आहे. कारण अनेक बड्या राजकीय नेते आणि उद्योगपतींवर ईडीकडून धडक कारवाई करण्यात आली. परंतु या सर्व प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक सर्वाधिक चर्चेतील आहे. ईडीने या दोन जणांना अटक करुन इतिहास निर्माण केला. ईडीमध्ये इतिहास निर्माण करणारे अधिकारी अतिरिक्त संचालक दर्जाचे आहे. त्यांच्याकडे हे सर्व हायप्रोफाईल प्रकरणे आहेत. त्याचे नाव आहे कपिल राज.
का चर्चेत आले कपिल राज..
2009 बॅचचे आयआरएस (IRS) अधिकारी कपिल राज यांनी 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या सरकारी निवासस्थानी अटक केली. इतिहासात अरविंद केजरीवाल पहिले मुख्यमंत्री ठरले, ज्यांना पदावर असताना अटक केली. या घटनेच्या 31 दिवसांपूर्वी 2024 मध्ये झारखंडचे तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली होती. परंतु सोरेन यांनी अटक करण्याचा तासाभरापूर्वी राजीनामा दिला होता. कपिल राज यांच्याकडे हे प्रकरण चौकशीसाठी आले होते.
कपिल राज अभियांत्रिकी पदवीधर
उत्तर प्रदेशातील रहिवाशी असलेले कपिल राज यांनी लखनऊमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी युपीएससीची परीक्षा दिली. त्यांची निवड झाल्यावर त्यांना कस्टम्स अँड सेंट्रल एक्साइज केडर दिले गेले. मुळ केडरवर काम केल्यानंतर 7 वर्षांपूर्वी त्यांना ईडीमध्ये प्रतिनियुक्ती दिली गेली. सध्या ते ईडीच्या मुंबई झोनल ऑफिसमध्ये उपसंचालक होते. मुंबईत काम करताना त्यांनी अब्जाधीश नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या प्रकरणाचा तपास केला. त्यांनीच झारखंडमधील अवैध खनन प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर 31 जानेवारी रोजी हेमंत सोरेन यांना अटक केली. तर मद्य नीती प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली.
तीन वर्षांपूर्वी दिल्लीत …
कपिलराज तीन वर्षांपूर्वी दिल्लीत आले होते. त्यांना ईडीत संयुक्त निर्देशक या पदावर पदोन्नती देण्यात आली. तसेच त्यांना झारखंड दिल्लीतील चौकशीची जबाबदारी देण्यात आली. या दरम्यान त्यांनी पश्चिम बंगालमधील कोळसा घोटाळा प्रकरणाची चौकशी केली. हे प्रकरण बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची टीएमसी पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांचे नाव होते.