
नवी दिल्ली : सूरत न्यायालयाच्या निर्णयानंतर खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्लीतील तुघलक लेनचा शासकीय बंगलाही सोडावा लागला आहे. हा शासकीय बंगला सोडताना राहुल गांधी आज भावूक झाल्याचं दिसून आलं. ही सत्य बोलण्याची किंमत मी चुकवत आहे, मी भारताच्या आवाजासाठी लढत असून त्यासाठी कोणतीही किंमत चुकवण्यास तयार आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.