कशेडी घाट उतरत असताना नियंत्रण सुटल्याने इंधनवाहू टँकर पलटी
रत्नागिरी : प्रतिनिधी महामार्गावरील अवघड कशेडी घाट उतरत असताना नियंत्रण सुटल्याने इंधनवाहू टँकर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक कमलेश वैजनाथ हा जखमी झाला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडलाघटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील शिवडी येथून इंधन भरलेला टँकर घेगून कमलेश वैजनाथ हा चालक गोव्याला जायला निघाला होता. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तो कशेडी घाट उतरत असताना त्याचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर रस्त्याची कडेला पलटी झाला. या अपघात टँकरमधील इंधन रस्त्यावरून वाहू लागले.
अपघाताची खबर मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी चालक कमलेश याला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेने कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले.