▪️मात्र युवकाला वाचवताना मोटारसायकल प्लॅटिना गाडी गेली वाहून
▪️पाण्याचा अंदाज न आल्याने रुपेश रघुनाथ नार्वेकर हे आपली गाडी घेऊन घरी जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहाबरोबर जात होते वाहून ..
♦️कुडाळ/माणगाव प्रतिनिधी:- माणगाव खोऱ्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली असून अनेक नाले तुडुंब भरून वाहत असताना आज सायंकाळी ७.३० वाजता माणगाव वरून नानेलीच्या जात असताना माणगावच्या सीमेवर नानेली काळकादेवी येथे एक नाला असून त्याला मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता याचवेळी रुपेश रघुनाथ नार्वेकर हे माणगाव वरून आपल्या घरी नाणेली येथे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याने गाडी पुलावरून पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे ते गाडी सहित खाली वाहून गेले तेवढ्यातच त्यांच्या पाठीमागून येत असणारे स्वप्निल नानचे व राजा चव्हाण हे दोघे आपल्या वैयक्तिक कामानिमित्त जात असताना वाचवा वाचवा असं ओरडण्याचा आवाज आला म्हणून मागे वळून पाहिले असता कोणीतरी युवक वाहत असल्याचे दिसले त्यावेळी स्वप्निल नांनचे यांनी आपला जीव धोक्यात घालून खाली उडी टाकून परेश नार्वेकर यांना वाचवले मात्र त्यांच्या ताब्यात असलेली त्यांचे मोटर सायकल पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले वाचवलेल्या स्वप्नील नांनचे यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले आहे
♦️तर आज स्वप्निल हे देव रूपानेच त्या ठिकाणी हजर झाले त्यामुळे माझा जीव वाचला अन्यथा मी वाहून गेलो असतो असे रुपेश नार्वेकर यांनी सांगितले स्वप्निल नांचे आणि राजा चव्हाण यांचे आभार मानले तात्काळ त्या ठिकाणी माणगावचे पोलीस अंमलदार श्री भोई दाखल होऊन वाहून गेलेला युवक व वाचवलेल्या युवक या दोघांची चौकशी करत पुढील तपास करत आहेत