
Raavrambha Movie News: फिरत्या चित्रपटगृहांचे स्वतंत्र असे मनोरंजन विश्व आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी प्रेक्षक या चित्रपटगृहांचे हक्काचे प्रेक्षक आहेत. ग्रामीण भागात मनोरंजनाचे हक्काचे साधन असलेल्या याच टुरिंग टॉकीज मध्ये आता ‘रावरंभा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. टुरिंग टॉकिज म्हणजे तंबूतला सिनेमा. मुंबई- पुण्यासारख्या शहरात प्रदर्शित झाल्यानंतर अनेक महिन्यांनी टुरिंग टॉकीजकडे येणारा सिनेमा म्हणजे गावकऱ्यांना पर्वणीच. काळाच्या ओघात आता हा व्यवसाय मागे पडला असला तरी जुनं ते सोनं या उक्तीनुसार दिग्दर्शक अनुप जगदाळे यांनी टुरिंग टॉकिजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे

टुरिंग टॉकीज मध्ये चित्रपट दाखवण्याबाबत दिग्दर्शक अनुप जगदाळे सांगतात की, टुरिंग टॉकीज ही केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते ती एक संस्कृती होती, पण अगदी जत्रा- यात्रांतही आकर्षण असणारे तंबू कालपरत्वे दुरापास्त होऊ लागले. अशा टुरिंग टॉकीजने ग्रामीण भागातल्या रसिकांचे रसिकत्व जपले. वाढविले.