
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे.
दहावीचा निकाल कधी, कुठे आणि किती वाजता पाहायला मिळणार? फक्त पास-नापास की मार्कही समजणार, जाणून घ्या एका क्लिकवर..
मुंबई प्रतिनिधी- दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा उद्या निकाल (SSC Result 2025) लागणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन दहावीचा निकाल पाहता येणार आहे.
राज्यातून 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते..
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात होती. बारावीचा निकाल लागल्यानंतर 10 दिवसांच्या आत निकाल लागेल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळं विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर उद्या 10 वीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, यंदा राज्यातून 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यातील 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून त्यांचे गुण ऑनलाइन पाहता येतील. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या सर्व साईटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.
10 वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
दरम्यान, यावर्षी बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी लागला होता. त्यामुळं आता सगळ्यांचे लक्ष 10 वी च्या बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाकडे लागले होते. बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळं पदवी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होईल. त्याचप्रमाणे, दहावीचा निकाल उद्या लागल्यानंतर लगेच अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील सुरू होणार आहे.
कधी झाली होती परिक्षा..
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान दहावीच्या परीक्षा घेतल्या. या परिक्षेला राज्यातील जवळपास 16.11 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8.6 लाख मुले, 7.47 लाख मुली आणि 19 ट्रान्सजेंडर उमेदवारांचा समावेश होता. दहवीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार mahresult.nic.in वर त्यांचे लॉगिन क्रेडेन्शियल्स, म्हणजेच रोल नंबर आणि आईचे पहिले नाव वापरून ऑनलाइन निकाल तपासू शकतात. निकाल कसा चेक करायचा यासंदर्भात डिटेल्स माहिती जाणून घेऊयात
विद्यार्थ्यांना कुठे पाहता येणार निकाल?
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे-
१. https://results.digilocker.gov.in
२. https://sscresult.mahahsscboard.in
३. http://sscresult.mkcl.org
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/mahara exams
७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharas results
८. https://www.indiatoday.in/education-today/results
९. https://www.aajtak.in/education/board-exam-result
s