“जैतापूर पोलीस ठाणे जाळलं तेव्हा तीनेच…” प्रसूती दरम्यान महिला पोलिस दगावली, आठवण सांगताना सहकाऱ्याच्या पापण्या ओलावल्या…

Spread the love

एका कर्तव्यदक्ष महिला पोलिस हेडकॉन्सेटबलचा प्रसुतीदरम्यान मृत्यू झाला. ज्यात त्यांचं बाळही दगावलं. या घटनेने रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या सहकार्याने त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगितल्या आहेत.


रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलीस मुख्यालयात हेडकॉन्स्टेबल पदावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूने अवघे जिल्हा पोलीस दल हळहळले आहे. शुक्रवारी 25 जुलै रोजी दुपारच्या दरम्यान ही घटना घडली आहे. सांची सुदेश सावंत (38,रा.हेरिटेज सोसायटी, आरोग्य मंदिर,रत्नागिरी) असे या महिला पोलिस हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे. त्या प्रसूतीच्या रजेवर होत्या.

पोलीस दलात कार्यरत असताना त्यांच्या कामाचा प्रामाणिकपणा प्रसंगावधनता या सगळ्याच्या आठवणी त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त होऊ लागल्या आहेत. कोकणात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधात मोठे आंदोलन झालं होतं. इतकंच नाही तर यावेळी राजापूर तालुक्यातील जैतापूर पोलीस ठाणे जाळण्यात आलं होतं. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या एकमेव महिला कर्मचारी सुलभा उर्फ सांची सावंत यांनी प्रसंगावधनता राखत या ठिकाणी असलेल्या रायफल सुरक्षित ठिकाणी ठेवल्या होत्या. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची भीती होती. ही अत्यंत मोठी व महत्त्वाची कामगिरी त्यांनी केली होती. स्मरणात राहतील अशा काही आठवणी त्यांच्या सहकाऱ्यांकडून व्यक्त होत आहेत.


“नाटे पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना दिवंगत सुलभा पांगळे म्हणजेच सांची सावंत मॅडम व त्यांचे पती सुदेश सावंत आणि खात्यातील इतर सहकारी म्हणजे प्रवीण खांबे, अजित मुजुमदार, राहुल घोरपडे, बंटी सावंत देसाई, राहुल गायकवाड, अमर मोरे सागर मुरुडकर असे आम्ही एकत्रित सेवा बजावत होतो. त्यावेळी त्यांनी दाखवलेली प्रसंगावधनता समयसूचकता खूप महत्त्वाची ठरली” अशी आठवण त्यांच्या एका सहकाऱ्याने व्यक्त केली आहे.

सांची सुदेश सावंत रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले असताना त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. या आकस्मिक मृत्यूची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यांचे पतीही जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात डॉग स्कॉड पथकात पोलिस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. सावंत कुटुंब हे मूळचे चिपळूण तालुक्यातील बुरंबी परिसरातील आहे आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलं असा परिवार आहे. या घटनेने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page