यंदा कधी आहे दिवाळी; वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, तारीख…

Spread the love

दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळी हा दिव्यांचा आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मात दिवाळी सणाला अतिशय महत्वाचं स्थान आहे.

मुंबई Diwali 2024 : हिंदू धर्मात दिवाळी सणाला (Diwali Festival 2024) विशेष महत्त्व आहे. आश्विन/कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळी साजरी केला जाते. दिवाळीला ‘दीपावली’ असेही म्हणतात. पाच दिवसांच्या दिवाळी सणाची सुरुवात वसुबारसपासून सुरू होते आणि भाऊबीजेच्या दिवशी दिवाळी संपते.

▪️वसुबारस : 28 ऑक्टोबर 2024

▪️धनत्रयोदशी : 29 ऑक्टोबर 2024

▪️नरक चतुर्दशी : 31 ऑक्टोबर 2024

▪️लक्ष्मी पूजन : 1 नोव्हेंबर 2024

▪️दिवाळी पाडवा : 2 नोव्हेंबर 2024

▪️भाऊबीज : 3 नोव्हेंबर 2024

कधी आहे वसुबारस ? (Vasubaras 2024) : वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो. या दिवशी गाई वासराची पूजा केली जाते. याला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं. यंदा वसुबारस 28 ऑक्टोबरला आहे.

कधी आहे धनत्रयोदशी ? (Dhanteras 2024) :

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. जी पंचांगानुसार त्रयोदशी तिथीला साजरी करण्यात येते. धनत्रयोदशीला धन्वंतरी जंयती असंही म्हणतात. धनत्रयोदशीला धन्वंतरी देव, कुबेर देव, माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा करतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त या दिवशी असतो. हा दिवश खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. यंदा मंगळवारी 29 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आहे. तर धनत्रयोदशीच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 6:31 पासून रात्री 8:31 पर्यंत असणार आहे.

कधी आहे नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi 2024) :

यावर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 30 ऑक्टोबरला दुपारी 1:15 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:52 वाजेपर्यंत असणार आहे. यंदा नरक चतुर्दशी 31 ऑक्टोबर गुरुवारी आहे. यादिवशी पहाटे उठून उटणं आणि तेल लावून अभ्यंगस्नान केलं जातं.

कधी आहे लक्ष्मीपूजन ? (Lakshmi Puja) :

अमावस्ये तिथीला लक्ष्मीपूजन करण्यात येतं. यंदा अमावस्या 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटाला सुरू होते आणि 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटानी संपते. त्यामुळं उदया तिथीनुसार 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन असणार आहे. यासाठी शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:36 ते 6:15 पर्यंत आहे.

दिवाळी पाडवा (Diwali Padwa 2024) :

लक्ष्मीपूजना झालं की, दुसऱ्या दिवशी ‘दिवाळी पाडवा’ साजरा केला जातो. यादिवशी पत्नी पतीला ओवाळून त्याच्या दीर्घयुष्याची कामना करते. हा सण 2 नोव्हेंबरला शनिवारी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 6.14 ते 8.35 मिनिटांपर्यंत आहे.

भाऊबीज (Bhai Dooj 2024) :

बहीण-भावासाठी भाऊबीजचा सण हा अतिशय जिव्हाळ्याचा असतो. यंदा हा सण 3 नोव्हेंबरला बुधवारी आहे. यासाठी शुभ मुहूर्त हा दुपारी 1 वाजून 19 मिनिटे ते दुपारी 3 वाजून 22 मिनिटांपर्यंत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page