रत्नागिरी: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे.आज सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये केलेल्या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, ज्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती त्याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेत एकनाथ शिंदेंसह त्यांच्याबरोबर गेलेल्या 40 अमदारांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या टिकेनंतर शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती.दरम्यान आज उद्धव ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा