
▪️अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अशातच यावर्षीच्या मान्सूनबद्दल माहिती देण्यासाठी हवामान विभागाकडून आज पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. ही पत्रकार परिषद दुपारी साडेबारा वाजता होणार असून यामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यानचा सरासरी पाऊसमान कसा राहणार हे जारी केले जाणार आहे.
यावेळी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन हे याबाबत माहिती देणार आहेत. त्यामुळे यंदा देशातील पावसाच्या स्थितीबाबत भारतीय हवामान विभाग नेमकी काय माहिती देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.