मोड आलेले धान्य खाणे –
रक्त वाढीसाठी एक उत्तम उपाय टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी असते जे रक्त वाढीसाठी अत्यंत गुणकारी मानले जातात…
गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे हा रक्त वाढी साठी योग्य उपाय ठरतो…
सफरचंद आणि बीट नियमित पणे तुमच्या आहारात असुद्या. सफरचंदाचा ज्यूस नियमित पणे प्यावा हा तुमच्या रक्त वाढी साठी उत्तम उपाय होऊ शकतो. या सफरचंदाच्या ज्यूस मध्ये जमल्यास एखादा चमचा मध देखील टाका. रक्त किंवा हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मध हे देखील गुणकारी आहे….
डाळिंब हे अतिशय गुणकारी असून, डाळिंब नियमित पणे खाल्यास तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण वाढते. डाळिंबात प्रथिने, लोह व फायबर असते ज्यामुळे तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
डाळिंबा पासून तुम्ही रक्त वाढीसाठी अजून एक उपाय करू शकता, डाळिंबाच्या रसा मध्ये थोडे काळे मीठ (सेंधव मीठ) आणि काही प्रमाणात मिरी पाऊडर मिसळा. असा रस दररोज पिल्याने तुमच्या शरीरातील आयर्न वाढण्यास आणि पर्यायाने रक्त वाढण्यास मदत होते.
सुकामेवा म्हणजेच काजू, बदाम, खारीक वगैरे दुधात भिजवून खाल्याने देखील रक्त वाढीसाठी मदत मिळते.