संकष्ट म्हणजे संकट आणि ते संकट दूर करणारी ही चतुर्थी म्हणून या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं.
संकष्ट म्हणजे संकट आणि ते संकट दूर करणारी ही चतुर्थी म्हणून या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं.
संकष्ट चतुर्थी 28 फेब्रुवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. विघ्नहर्त्या गणरायाकडे संकटं दूर कर असा वर मागितला जाणार आहे. महाराष्ट्रासह देशात गणरायांची ही चतुर्थी अत्यंत भक्तीभावात साजरी केली जाणार आहे. अशात संकष्ट चतुर्थी आणि विनायक चतुर्थी यातला फरक आणि संकष्ट चतुर्थीची पूजा पद्धत आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे संकष्ट चतुर्थीचा अर्थ….
संकष्टीचा अर्थ..
संकष्ट अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटांवर विजय मिळवून देणारी अशी ही एकादशी आहे असा त्याचा अर्थ आहे. संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संस्कृत भाषेतील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे. कोणत्याही प्रकारचे दु:ख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा करावी. या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात.
संकष्टी आणि विनायक चतुर्थी यातील फरक..
अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षाच्या पौर्णिमेनंतर येणार्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हणतात.
संकष्टी गणेश चतुर्थी पूजा पद्धत काय आहे…
‘मम वर्तमान-गामी- सकलनिवारक- सकल-अभिष्टसिद्धये गणेश चतुर्थीव्रतमहान करिष्ये’ या ओळींसह ज्या भक्तांना हे व्रत करायचं आहे किंवा चतुर्थीचा उपवास करायचा आहे त्यांनी या ओळी म्हणत हे व्रत ठेवावं. हे व्रत ब्रम्ह मुहूर्तात केलं तर ते जाय्सत फलदायी असतं.
यानंतर एखाद्या शुभ मुहूर्तावर लाल किंवा पिवळे स्वच्छ कापड पाटावर ठेवावे आणि श्रीगणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. पूजा करण्यापूर्वी तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे हे लक्षात ठेवा. यानंतर गंगाजल सर्वत्र शिंपडावं आणि शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा. यानंतर गणेशाला फुले, चंदन, अक्षता, विडा आणि दक्षिणा अर्पण करून २१ दुर्वांची जुडी वाहावी. गणरायांची मनोभावे पूजा करावी.देवासमोर केळी आणि उकडीच्या मोदकांचा प्रसाद ठेवावा. त्यानंतर गणरायाला आवाहयामी असं म्हणत भोजनाचं आमंत्रण द्यावं. दिवसभर व्रत ठेवावे, नंतर चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करून उपवास सोडावा.