काश्मीरचं नाव बदलणार? काय आहे नवं नाव? अमित शाहांचं मोठं वक्तव्य…

Spread the love

मोठी बातमी समोर येत आहे, काश्मीरचं नाव आता बदललं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून याबाबत संकेत देण्यात आले आहेत.

काश्मीरचं नाव बदलणार? काय आहे नवं नाव? अमित शाहांचं मोठं वक्तव्य…

नवी दिल्ली /प्रतिनिधी – मोठी बातमी समोर येत आहे, काश्मीरचं नाव आता बदललं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून याबाबत संकेत देण्यात आले आहेत. ते ‘J&K and Ladakh Through the Ages’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की काश्मीरचं नावं कश्यपपासून असू शकतं. शंकराचार्य, सिल्क रूट आणि हेमिश मठ याच्यावरून हे सिद्ध होतं की भारतीय संस्कृतीचा पाया हा काश्मीमध्येच घालण्यात आला. इथे सुफी आणि बौद्ध संस्कृती देखील खूप चांगल्या पद्धतीने रूजली गेली.

काश्मिरी, डोगरी, बाल्टी, झंस्करारी या भाषांना सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी काश्मीर संदर्भात खूप विचार करतात. काश्मीरमधील ज्या स्थानिक भाषा आहेत त्या जीवंत राहिल्या पाहिजेत, त्यांचं जतन झालं पाहिजे असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आग्रह होता, त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की,कलम 370 आणि 35 ए हा देशाच्या एकतेमधील सर्वात मोठा अडथळा होता. मात्र आता मोदी सरकारनं हा अडथळा दूर केला आहे. कलम 370 हटवण्यात आलं आहे. त्यानंतर जम्मू -काश्मीरमध्ये विकासाची नवी गंगा आली आहे. अनेक विकास प्रकल्प या ठिकाणी सुरू आहेत.

भारताच्या सीमा संस्कृती आणि परंपरेवर आधारीत…

काश्मीरचा इतिहास पुस्ककाच्या रुपानं पुढे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जगात भारत असा ऐकमेव देश आहे, जिथल्या सीमा या संस्कृती आणि परंपरेवर आधारीत आहेत. म्हणून काश्मिरपासून ते कन्याकुमारीपर्यंत भारत एक आहे. जर तुम्हाला भारत समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला आधी तेथील संस्कृती, परंपरा समजून घ्याव्या लागतील, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.  आपल्या देशाला तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटकांना तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, चुकीच्या इतिहासाची मांडणी करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, असा आरोपही यावेळी शाह यांनी केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page