महाराष्ट्रात रेल्वे सुसाट, बजेटमध्ये काय? …

Spread the love

महाराष्ट्रात रेल्वे सुसाट, बजेटमध्ये काय?केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठीही मोठी घोषणा करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात रेल्वे सुसाट, बजेटमध्ये काय?…

नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 23 जुलै रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सर्वसामान्यांसाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेसाठीही मोठी घोषणा (Big announcement for Railways) करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात (Budget 2024) रेल्वेसाठी 2 लाख 62 हजार 200 एवढा विक्रमी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता रेल्वेच्या चाकांना अधिक गती मिळणार आहे. रेल्वेला जागतिक दर्जाची अर्थव्यवस्था बनवण्यावर सरकारनं विशेष भर दिल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. अंतरिम अर्थसंकल्पानुसार केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील विविध रेल्वे प्रकल्पांसाठी 15 हजार 554 कोटींची तरतूद केली होती. याशिवाय तीन प्रमुख रेल्वे कॉरिडॉअरची घोषणाही सरकारकडून करण्यात आली आहे. या कॉरिडोअरचा बराचसा भाग महाराष्ट्र्रातून जाणार आहे.

रेल्वेच्या चाकांना अधिक गती मिळणार आहे. रेल्वेसाठी 2 लाख 62 हजार 200 कोटी खर्चाची तरतूद आहे. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तीन प्रमुख रेल्वे कॉरिडोअर उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

🔹️रेल्वेचे नवे ट्रॅक, महाराष्ट्रात काय?

▪️नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग 275 कोटी

▪️बारामती-लोणंद रेल्वेमार्ग 330 कोटी

▪️वर्धा-नांदेड रेल्वेमार्ग 750 कोटी

▪️सोलापूर-धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्ग 225 कोटी

▪️धूळे-नरडाना रेल्वेमार्ग 350 कोटी

▪️कल्याण – मुरबाड – बारस्ता – उल्हासनगर 10 कोटी

🔹️दुसरी, तिसरी आणि चौथी मार्गिका प्रकल्प-

▪️कल्याण-कसारा तिसरी मार्गिका 85 कोटी

▪️वर्धा-नागपूर तिसरी मार्गिका 125 कोटी
वर्धा-बल्लारशाहा

▪️तिसरी मार्गिका 200 कोटी

इटारसी-नागपूर

▪️तिसरी मार्गिका 320 कोटी
पुणे-मिरज

▪️दुसरी मार्गिका 200 कोटी
दौंड मनमाड

▪️दुसरी मार्गिका 300 कोटी
वर्धा-नागपूर

▪️चौथी मार्गिका 120 कोटी
मनमाड-जळगाव

▪️तिसरी मार्गिका 120 कोटी
जळगाव-भुसावळ

▪️चौथी मार्गिका 40 कोटी
भुसावळ- वर्धा

▪️तिसरी मार्गिका 100 कोटी

▪️गेज रुपांतर
पाचोरा-जामनेर मार्ग 300 कोटी

🔹️वार्ड नूतनीकरण-

कसारा 1 कोटी
कर्जत 10 कोटी
पुणे 25 कोटी

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page