निवडणूक व्यवस्थापन म्हणजे काय रं भाऊ? निवडणूक व्यवस्थापन कंपन्या नेमकं काय काम करतात?

Spread the love

निवडणूक हि देशाचं भवितव्य ठरवणारी महत्त्वाची बाब आहे. या निवडणूकांमधून जनतेचे लोकप्रतिनिधी लोकांसमोर येत असतात. लोकप्रतिनिधी हे त्यांचं विकासाचं व्हिजन लोकांसमोर मांडतात. यातून लोकांचा पाठिंबा मिळवतात आणि मग निवडणूकीत लोकांच्या मतधिक्यांनी निवडून येतात. मात्र,एखाद्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी एका यंत्रणेची गरज भासत असते. हि यंत्रणा संबंधित उमेदवाराला निवडून आणण्यासाठी, संबंधित उमेदवाराचं व्हिजन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवत असते. तसंच संपुर्ण मतांचं व्यवस्थापन करत असते. आज आपण याच यंत्रणेविषयी चर्चा करणार आहोत.

एखाद्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी प्रचार आणि प्रसार या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तसंच आपण ज्या मतदारसंघातून उभे राहत आहोत,त्या मतदार संघांचा सर्वांगीण अभ्यास करणं संबंधित उमेदवारासाठी महत्त्वाचं असतं. यामध्ये मतदार संघांतील विकास कामे असतील, रखडलेली कामे असतील, मतदार संघातील समस्या असतील किंवा स्थानिक दुर्लक्षित राहिलेले प्रश्न असतील या सर्वांचा अभ्यास करून संबंधित उमेदवाराला निवडून आणण्यासाठी रणनीती ठरवावी लागते. अश्यावेळी उमेदवाराच्या या बाजू निवडणूक यंत्रणा सांभाळत असते. हि यंत्रणा संबंधित उमेदवारासाठी संपुर्ण निवडणूकीचे व्यवस्थापन करते. हे व्यवस्थापन म्हणजेच प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक विजयाची पहिली पायरी.

आज महाराष्ट्रात अनेक नामवंत निवडणूक व्यवस्थापन कंपन्या आहेत. यातली महत्त्वाची आणि महाराष्ट्रभरात नावलौकिक मिळवलेली कंपनी म्हणजे ‘आचार्य इलेक्शन मॅनेजमेंट कंपनी’. हि कंपनी आजवर बहुसंख्य उमेदवारांच्या विजयाची साक्षीदार राहिली आहे.या कंपनीने या उमेदवारांच्या विजयाचे क्षण जवळून अनुभवले आहेत.या कंपनीसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी acharya elections या सांकेतिक स्थळाला भेट द्या किंवा 084548 60180 या क्रमांकावर संपर्क साधा.

निवडणूक व्यवस्थापन कंपन्या नेमकं काय काम करतात?

एखादा उमेदवार जर निवडणूकीला उभा राहणार असेल तर त्याला ग्राउंड सर्वे उपलब्ध करून देणे, मतदार याद्यांची माहिती मिळवणे, त्यावर योग्य विश्लेषण करून त्यानुसार मतदार संघातील लोकांसाठी विकासाचं व्हिजन संबंधित उमेदवाराला बनवून देणे, कोणत्या भागात कोणत्या समस्या आहेत त्यावर तेथील लोकांसमोर कोणता विषय मांडणे गरजेचे आहे, याविषयीची संपुर्ण माहिती संबंधित उमेदवाराला उपलब्ध करून देणे. उमेदवार जिथे कमी पडतो, त्यावर भर देऊन त्याला योग्य मार्गदर्शन करणे. त्याचे व्हिजन लोकांपर्यंत योग्यरित्या पोहचण्यासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर करणे. उमेदवाराचा लोकांसोबत जनसंपर्क दांडगा करणे अश्या नानाविध गोष्टी करून उमेदवारासाठी अचूक रणनिती देण्याचं काम हि व्यवस्थापन कंपनी करते.

खरंतर अश्या कंपन्या आज उमेदवारांचं भवितव्य ठरवतात.त्यातून सक्षम नेतृत्व घडवतात. या कंपन्यांची गरज ओळखूनच आज या क्षेत्राकडे अनेक तरूण वळत आहेत. तसंच आपलं भवितव्य ओळखून अनेक उमेदवार आपला विजय निश्चितीकडे वाटचाल करत आहेत. दरम्यान लोकशाहीसाठी या कंपन्या एक मिसाल बनून हरएक उमेदवाराला सक्षमपणे लोकांसमोर आणण्यासाठी काम करत आहेत.

या कंपन्यांचं उद्दिष्टं काय?

या कंपन्या कार्य सक्षम नेता घडवत असतात. लोकशाहीला बळकट करण्यासाठी उमेदवाराला योग्य गोष्टी जाण असणे गरजेचे आहे.त्यासाठी त्या उमेदवाराला माहिती उपलब्ध करून देण्यापासून ते त्या उमेदवाराच्या सर्वसामान्य ज्ञानात भर घालण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी या कंपन्या करत असतात.यातून दूरदृष्टी कार्यक्षमता बाळगणारा नेता घडावा व तो प्रदिर्घ काळ राजकारणात टिकावा हेच या कंपन्यांचे उद्दिष्ट असते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page