दिल्ली- महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुनावणी ज्या पांच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर झाली, त्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती एम.आर. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत, तत्पूर्वीच निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जर न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी महाराष्ट्राचा निकाल आला नाही तर मात्र भयंकर गुंतागुंतीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सुनावणी ज्या पांच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर झाली, त्या घटनापीठातील एक न्यायमूर्ती एम.आर. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होत आहेत, तत्पूर्वीच निकाल येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी महाराष्ट्राचा निकाल आला नाही तर काय?
महाराष्ट्रातील राजकीय पेच प्रसंगातून मार्ग काढणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय 8 ते 12 मे दरम्यान दिला जाण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती शाह हे निवृत्त होण्यापूर्वी निकाल न येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे; पण जर न्यायमूर्ती शाह निवृत्त होण्यापूर्वी महाराष्ट्राचा निकाल आला नाही तर मात्र भयंकर गुंतागुंतीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
न्यायमूर्ती शाह हे निवृत्त होण्यापूर्वी जर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आला नाही तर काय, या शक्यतेविषयी गेली अनेक वर्षे सुप्रीम कोर्टात वकिली करणारे मराठी विधीज्ञ अॅड. प्रशांत केंजळे यांच्याशी “झी 24 तास” वृत्तवाहिनीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी खास बातचीत केली. त्यासंदर्भात आपण जाणून घेऊया …
अॅड. प्रशांत केंजळे म्हणाले, की सुप्रीम कोर्टात अशी पद्धत आहे, की जर सुनावणी घेणारे एखादे न्यायाधीश निवृत्त होत असतील आणि राखीव असलेला निकाल त्यांनी निवृत्तीपूर्वी त्यांनी दिला नाही, तर संपूर्ण सुनावणी रद्द होते. मग पुन्हा घटनापीठ तयार होणार आणि पुन्हा पहिल्यापासून सुनावणी घेतली जाणार. मग त्या सुनावणीवर आधारित निकाल दिला जाईल. त्यामुळे शाह निवृत्त होण्यापूर्वी निकाल येणार नाही, ही शक्यता अतिशय कमी आहे. पण जर चुकून तसे झालेच तर आतापर्यंतची सर्व सुनावणी रद्द होणार. शक्यता अशी जास्त आहे, की 8 मे रोजीच निकाल दिला जाऊ शकतो.