
डांबरी रस्ता,साकव,पाखाडी,नळ योजना , स्मशानभूमी…मंजूर करून घेणे यातून आपापला हिस्सा मिळवणे,शक्य असल्यास cotract मिळवणे म्हणजे गावाचा विकास…
• कोकणात काही सन्माननीय अपवाद वगळता जवळपास सर्व गावात मनाला अस्वस्थ करणारी ही परिस्तिथी आढळते.एक अतिशय प्रशिक्षित राजकीय टोळके निवडक 4/5 जण अतिशय कार्यक्षमतेने हे काम करताना दिसतात व हे काम म्हणजेच गावाचा विकास हे गावकऱ्यांना पटउन देतात .
• गावातील छोटी मोठी कामे contract हे गावगन्ना पुढारी घेतात व मोठी कामे बाहेरील contractor घेऊन यांची व्यवस्था करतात.
• यामुळे रस्ता तयार होतो वर्षभरात डांबर वाहून जाते.पाखाडी तयार होते पण पूर्वीची लाल मातीची पायवाट बरी म्हणावे लागते.स्मशान कुठे आणि शेड् कुठे शोधावी लागते ,लाखो रुपयांची नळ योजना तयार होते दोन वर्षात बंद पडते पाणी शोधावे लागते. रस्ता,पाखाडी,इमारत...कसेही बांधा काही वेळा नाही बांधलात तरी चालेल पण आमचा हिस्सा आमच्या पर्यंत पौहचवा भ्रष्ट सरकारी अधिकारी यांचे यामुळे चांगलेच फावते.
• ही दुर्दैवी स्थिती सर्वत्र दिसतेय यालाच आपण सर्वजण विकास म्हणतो.मुंबई मंडळापासून गावकऱ्यांपर्यंत सर्व जण अभिमानाने आमच्या गावात आमक्या पुढाऱ्यांने इतका फंड आणला म्हणून कौतुक सुरू असते .
• त्यातून फरक काय पडला तर गावातील निम्मी घरे रिकामी झाली.गावांचे वृद्धाश्रम झाले.ज्या शाळेत पूर्वी 200 मुले होती तिथे 20 मुले आहेत.गावात शेती कमी झाली कोणताही रोजगार कोणी आणला नाही .
उखडलेले रस्ते,दगड नसलेल्या पाखाड्या,पाणी नसलेले नळ सर्वत्र दिसतात ….