ब्रिस्बेन- वेस्ट इंडिज संघाने ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अवघ्या ८ धावांनी थरारक विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह वेस्ट इंडिजने ऑस्टेलियाविरुद्ध २७ वर्षांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने कांगारुंना सामन्याच्या चौथ्या डावात २१६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. विंडिजने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाला २०७ धावांवर रोखलं.
ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी चौथ्या डावात 216 धावांचे लक्ष्य होते. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा संघाने 2 गडी गमावून 60 धावा केल्या होत्या आणि चौथ्या दिवशी त्यांना विजयासाठी आणखी 156 धावा करायच्या होत्या. मात्र विंडीज संघाचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने अप्रतिम कामगिरी करत कांगारुंच्या फलंदाजांना जेरीस आणले.
त्याने जबरदस्त कामगिरी करत सामन्यात एकूण 7 विकेट घेतल्या. जोसेफने कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांना आपले बळी बनवले. शामर जोसेफने 11.5 षटकात 68 धावा देत 7 बळी घेतले. कांगांरुंकडून स्टीव्हन स्मिथने चिवट फलंदाजी करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. स्मिथने टीमसाठी नाबाद 91 धावा केल्या.
दरम्यान, डेब्यूटंट शामर जोसेफ या वेस्ट इंडिजच्या विजयाचा हिरो ठरला. या कसोटी मालिकेत शामरने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले आणि एकूण 13 बळी घेतले. या डावात ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथने नक्कीच ९१ धावा केल्या पण इतर कोणत्याही फलंदाजाला ५० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.