रामपेठ येथील अंगणवाडी नवागतांचे स्वागत…

Spread the love

संगमेश्वर : अर्चिता कोकाटे / नावडी- संगमेश्वर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प देऊन संगमेश्वर अंतर्गत रामपेठ येथील नवागतांचे स्वागत करण्यात आले.
     

कार्यक्रमाला मान्यवर नावडीच्या  सरपंच प्रज्ञा कोळवणकर,  ग्रामपंचायत सदस्य प्रतीक्षा शेरे,  सहाय्य पोलीस उपनिरीक्षक विजया तांबडे, कायदा साथी दिनेश अंब्रे आदी उपस्थित होते.
        

चिमुकल्यांच्या अंगणवाडी प्रवेशाच्या वेळी मान्यवर व पालकांनी पुष्पदृष्टी केली तसेच बालकांच्या पावलांचे ठसे उमटवण्यात आले. त्यानंतर त्यांची चरण पूजा केली गेली व आरती करून हर्ष उत्सवात शानदारपणे प्रवेश करण्यात आला.


      
अतिथी सरपंच प्रज्ञा  कोळवणकर व सर्व मान्यवरांचे सेविका पल्लवी शेरे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.यावेळी पालकांचे व बालकांचे देखील गुलाब पुष्प देऊन तसेच चिमुकल्यांना फुगे व खाऊ वाटप करून अंगणवाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले. सण २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षात मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा असे मनोगत सौ. प्रज्ञा कोळवणकर यांनी व्यक्त केले व भावी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी सेविका पल्लवी शेरे यांनी अंगणवाडी सेविकेचे वार्षिक उपक्रमाची माहिती दिली. यामध्ये मुलांची वैयक्तिक स्वच्छता, पोषण आहार, लसीकरण, टी एच आर, अंगणवाडीची स्वच्छता, पाणी उकळून पिणे, पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या आजारांवर कशी मात करावी इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केले.
            

अंगणवाडी मदतनीस शितल अंब्रे यांनी पावसाचे पाणी साठवून त्याचे भविष्यात गरज भासल्यास पाण्याच्या गरजेवेळी कसा उपयोग करावा याविषयी माहिती दिली.
     

चिमुकल्यांच्या बरोबर त्यांच्या वयाचे होऊन शिकवावे लागते, त्यांना समजून घ्यावे लागते ही मोठी जबाबदारी सेविका पल्लवी शेरे आणि शितल अंब्रे या नेहमीच उत्साहाने पार पाडत असतात.
     

कायदासाथी दिनेश अंब्रे यांनी भविष्यातील देशाचे आधारस्तंभ असणारी बालके यांचे कुपोषित होणार नाही याची सेविका मदतनीस व पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे असे विचार व्यक्त केले व बालकांना भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त केल्या.
        

संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजया तांबडे यांनी चिमुकल्याना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कायद्यासाथी तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश अब्रे यांनी कायद्याचे पुस्तक व गुलाब पुष्प देऊन सेविका पल्लवी शेरे यांचा मान्यवर सरपंच प्रज्ञा कोळवणकर,  सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया तांबडे यांच्या शुभहस्ते सत्कार केला तसेच मदतनीस शीतल अंब्रे यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. उपस्थितांचे आभार मदतनीस शीतल अंब्रे यांनी मांडले.
    

विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या पाऊलखुणा जतन करून ठेवणार असल्याचे सेविका पल्लवी शेरे यांनी सांगितले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page