बुधवार दि. १५ मार्च २०२३

Spread the love

मेष
( शुभ रंग- मरून )

आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. नास्तिक मंडळीही आज देवाला एखाद्या नवस बोलतील. घरात एखादे धार्मिक कार्य करण्याचे तुमच्या मनात येईल. दैवाची साथ राहील.

वृषभ
(शुभ रंग- पांढरा)

व्यवसायातील वाढत्या स्पर्धेने आज व्यावसायिक त्रस्त असतील. अडचणीच्या प्रसंगी पत्नीची खंबीर साथ मिळेल. आज तुम्ही कुटुंबास पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल.

मिथुन
( शुभ रंग- लाल)

धंद्यातील रखडलेली येणी वसूल होतील. गोड बोलून आपल्या विरोधकांनाही तुम्ही आपलेसे कराल. जुनी दुखणी आज अंगावर काढू नका. विश्रांती ही गरजेची आहे.

कर्क
(शुभ रंग- निळा.)

व्यावसायिक मंडळींना वाढत्या स्पर्धेचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या काही तक्रारी आज तुम्हाला त्रस्त करतील. संध्याकाळी डॉक्टरांच्या भेटीचा योग दिसतो आहे.

सिंह
(शुभ रंग- मोतिया )

कुटुंबीयांच्या वाढत्या मागण्या पुरवताना तारेवरची कसरत होणार आहे. मुले आज अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करतील. गृहिणी आज पाहुण्यांची उठबस अगत्याने करतील.

कन्या
( शुभ रंग- पिस्ता)

सामाजिक कार्यकर्ते लोकांच्या आदरास पात्र होतील. आज तुम्ही गरजूना आवर्जून मदत करण्याचा प्रयत्न कराल. इतरांची मने सांभाळाल. आज काही शुभ समाचार येतील.

तूळ
( शुभ रंग- डाळिंबी)

आवक पुरेशी असल्याने मनासारखा खर्च करता येईल. क्षुल्लक कारणावरून शेजारी आज रुसून बसतील. आज जरा स्पष्ट वक्तेपणाला आवर झालेला हवा नाहीतर नाती दुरावतील.

वृश्चिक
(शुभ रंग- मरून)

आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घ्यायची तुमची तयारी नसेल. घाईगर्दीत घेतलेले काही निर्णय चुकतील. हातचे सोडून पळत्या मागे धावाल.

धनु
(शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

एखादी हरवलेली वस्तू पुन्हा शोधली तर सापडेल. आज तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर द्याल. नवी वस्त्र खरेदी कराल. घरात थोरामोठ्यांच्या होला हो करा पण वाद वाढवू नका.

मकर
( शुभ रंग- गुलाबी)

महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल. आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. अधिकारी वर्गास विदेश दौरे घडतील. आज तुम्हाला विविध प्रलोभने आकर्षित करतील.

कुंभ
(शुभ रंग – जांभळा)

नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामातील समर्पणाची दखल घेतील. नव्या व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. कामाच्या व्यापात घरगुती समस्या मात्र दुर्लक्षित होणार आहेत.

मीन
(शुभ रंग – निळा )

काही मनाविरुद्ध घटना घडतील. व त्यामुळे तुम्हाला नैराश्य येईल. नोकरदारांना अधिकाऱ्यांच्या दडपणात काम करावे लागेल. आज फक्त कर्तव्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे अति व्यस्त दिवस.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page