कर्जत तालुक्यात पाणी टंचाईची झळं!

Spread the love

कर्जत तालुक्यात आदिवासी भागात पहिला शासकीय टँकर पोहचला,
१८ गाव ६० वाड्यांची भिस्त सध्या १ टँकरवर

नेरळ – सुमित क्षीरसागर

        आदिवासी बहुल कर्जत तालुक्यात उन्हाच्या झळांसोबत तीव्र होते ती पाणीटंचाई, त्यामुळे दुर्गम भागात पाणी टंचाईवर मत करण्यासाठी शासनाकडून पाण्याचे टँकर देण्यात येतात. यावर्षी एप्रिल महिना सारून गेला तरी टँकरचा पत्ता नव्हता अशात दिनांक १५ रोजी तालुक्यात पाण्याचा पहिला शासकीय टँकर दाखल झाला आहे. दरम्यान पाणी टंचाई कृती आराखड्यानुसार १८ गावे आणि ६० वाड्यांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला होता. मात्र या एका टँकरवर सध्या या साऱ्याची भिस्त अवलंबून असणार आहे.   
        कर्जत तालुक्यात डोंगरावर असलेल्या आदिवासी वाड्यांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत असते. उन्हाळयात कोरड्या पडणाऱ्या पोश्री आणि चिल्हार नदीच्या लगतच्या गावांमध्ये पाण्याची समस्या मार्च महिन्यात सुरू झाल्यापासून जाणवू लागते. त्यात त्या ठिकाणी असलेल्या नळपाणी योजना कोलमडून पडत असल्याने तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न दरवर्षी गंभीर होत असतो. ते लक्षात घेवून पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये राहणाऱ्यांची पिण्याचे पाणी आणण्यासाठी होणारी पायपीट लक्षात घेवून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकरमधून पाणी पुरवठा करण्याचा आराखडा कर्जत तालुका पाणीटंचाई कृती समितीकडून तयार करण्यात येतो. नादुरुस्त असलेल्या विंधन विहिरीची दुरुस्ती करणे, तसेच विहिरींची दुरुस्ती आणि त्यातील गाळ काढणे याशिवाय नवीन विंधन विहिरी खोदण्याचे काम देखील कृती आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी पाणी टंचाईवर परिस्थीती उद्भवणाऱ्या गावांचा समावेश करण्याची गरज आहे,
  अशा १८ गावे आणि ६० आदिवासी वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मागील वर्षी तालुक्यातील १६ गावे आणि ५६ आदिवासी वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवणार असा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या वर्षी तालुक्यातील खांड्स, ओलमन, व वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा चेवणे, नांदगाव, तुंगी, ढाक, पेठ, अट निड, अंत्रट बरेडी, मोग्रज, पिंगळस, धामणी, खानंद, अंभेरपाडा, मोहोपाडा, भोपळेवाडी, सुतार पाडा, गरुड पाडा अशा १८ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती उद्भवणार आहे. तर तालुक्यातील ६० आदिवासी वाड्यांमध्ये पाण्याची टंचाई भासणार असल्याने तेथील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला . मात्र असे असले तरी दोन टँकर या सगळ्या कृती आराखड्याचा भर वाहत असतात. त्यामुळे पाणी समस्या बिकट होऊ लागते. ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याच्या पाण्यासाठी संगर केला होता त्याच बाबासाहेब यांच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी कर्जत तालुक्यात शासकीय पहिला टँकर दाखल झाला आहे. तर ताडवाडी येथे टँकरने पाणी पुरवठा केला आहे. पाणी समस्या तांडवाडी येथे कायम उद्भवत असल्याने येथील महिला रात्री विहरीवर रात्र झोपून काढत होत्या. तर याबाबत त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना भेटून आपली समस्या बोलून दाखवली होती. त्यानंतर तालुक्यात पहिला टँकर ताडवाडी येथे पोहचाल असून टँकरचे पाणी विहरीत सोडून त्यातून महिला पाणी भरत आहेत. एका टँकर आल्याने सध्या तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागात टँकरने पाणी पोहचवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यावेळी कर्जत पंचायत समितीचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गोवर्धन नखाते, कृषी विभागाचे चिंतामण लोहकरे यासह मोठ्या प्रमाणात ताडवाडी ग्रामस्थ महिला आदी उपस्थित होते. तर पाणी मिळाल्याने ग्रामस्थांनी देखील प्रशासनाचे आभार मानले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page