पाण्याला कोणताही जात धर्म नाही म्हणून पाण्याचे राजकारण करू नका – खासदार राजेंद्र गावित

Spread the love

१७ गावे सरपंच ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते कुणाल पाटील यांच्या अथक पाठपुराव्याने पाणी समस्या सुटणार.

पालघर (प्रतिनिधी) सफाले, उंबरपाडा, नंदाडे १७ गावे पाणीपुरवठा योजना या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांनी १७ गावचे लोकप्रतिनिधी सरपंच सामाजिक कार्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करून पाण्याला जात धर्म नसतो पाण्याबाबत राजकारण करू नका अशा सूचना प्रशासन व अधिकारी यांना दिल्या. एकूण थकबाकी वीज बिलावरील व्याजदर व इतर आकार कर शासनच्या OTS योजने अंतर्गत कमी करून उर्वरीत वीजबिल आपल्या सर्वांच्या सामाजिक दायित्वातून थकित वीज बिलाचा प्रश्न सोडवूया असे आव्हान करून स्वतः राजेंद्र गावित यांनी वैयक्तिक सहा लक्ष रुपयाचा निधी देऊन उर्वरित चार लक्ष १६ हजार ६२० रुपये सफाळे, टेंभी खोडावे, मांडे, विराथन (बु) करवाळे, जलसार, माकणे, कांद्रेभुरे, वाढीव, नवघर घाटीम,कर्दळ, इत्यादी गावांच्या कर व लोकवर्गणीच्या माध्यमातून देऊन थकित बिलाचा प्रश्न मार्गी लावला.

१७ गावे ग्रामस्थ व सरपंच लोकप्रतिनिधी यांच्या म्हणण्यानुसार १७ गावे पाणीपुरवठा समिती सक्षम नसल्याने ती बरखास्त करून ही योजना जिल्हा परिषद पाणीपुरवठा कडे वर्ग करावी अशी मागणी ही खासदार गावीत ह्यांनी केली.
सदर बैठकीस सभापती शैला कोळेकर, पंचायत समिती पालघर, विनया पाटील, जि.प.सदस्या, धोडी व सिमा मॅडम, प समिती सदस्या, १७ गावचे सरपंच, उप सरपंच, सदस्य, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप, महाराष्ट्र जलजीवन प्राधिकिरणाचे अधीक्षक अभियंता कांबळे, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता, निवडुंगे, महाराष्ट्र वीज मंडळ कार्यकारी अभियंता जरग, उप अभियंता कदम, व भैतुले
गटविकास अधिकारी, रेवंडकर, नायब तहसीलदार पूजा भोईर, इ उपस्थित होते.

पाणी हा आपला मूलभूत अधिकार आहे म्हणून मापदंड निहाय पाणीपुरवठा करणार असून ह्या करिता प्रत्येक गावनिहाय पाणी मीटर स्थानिक खासदार निधी मधून उपलब्ध करून देणार असेही खासदार राजेंद्र गावित ह्यांनी जाहीर केले.

महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरण अंतर्गत पालघर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना करिता रुपये बाराशे कोटी निधी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून प्राप्त झाल्याने खासदार राजेंद्र गावित यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page