इस्त्रायल हमास यांच्यातील युद्ध अजूनही (Israel Hamas War) सुरुच आहे. आता तर युद्ध जास्तच भडकत चालले आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीत (Gaza City) जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. त्यानंतर आता युद्धाच्या मैदानातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. वेस्ट बँक परिसरात पॅलेस्टाईनचे (Palestine) राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यातून राष्ट्राध्यक्ष अब्बास थोडक्यात बचावले आहेत. हा हल्ला जीवघेणा असाच होता. या हल्ल्यात हल्लेखोरांचा अब्बास यांना जीवे मारण्याचा कट होता अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली. राष्ट्राध्यक्षांच्या संरक्षण ताफ्यातील अधिकाऱ्यांनी प्रत्युत्तरात गोळीबार करत हा हल्ला परतवून लावला.
प्रियकराच्या मृतदेहासह ती.. हमासच्या हल्ल्यात वाचलेल्या तरूणीने सांगितली आपबिती
राष्ट्राध्यक्ष अब्बास यांच्या संरक्षणासाठी असलेल्या जवानांनी जोरदार प्रतिकार केला. भर रस्त्यात बराच वेळ हा गोळीबाराचा थरार सुरू होता. जवानांच्या तीव्र प्रतिकारानंतर हल्लेखोर तिथून पळून गेले. येथील एका संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांना इस्त्रायलवर कारवाई करण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. मात्र, अब्बास यांनी काहीच कारवाई केली नाही असे स्पष्ट करत संघटनेने अब्बास यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचे आता समोर आले आहे.
दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी सुमारे तीन हजार हमास दहशतवादी इस्रायलच्या सीमेत घुसले आणि हवाई, जमीन आणि समुद्र अशा तिन्ही बाजूंनी हल्ला केला. या काळात इस्रायलमध्ये सुमारे 1400 लोक मारले गेले आणि 245 लोकांना ओलीस ठेवण्यात आले. यानंतर इस्रायलने गाझा पट्टीमध्ये हमासच्या ठिकाणांवर बॉम्बफेक करण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये आतापर्यंत 9 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
थोडं थांबू, पण हल्ले करणारच – नेत्यानाहू
▪️गाझातील युद्धसंघर्षात थोडा युद्धविराम घेण्याची तयारी आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत शस्त्रसंधी करणार नाही, अशी ठाम भूमिका इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी व्यक्त केली. याचाच अर्थ असा की आता इस्त्रायल इतक्यात युद्ध थांबविण्याच्या विचारात दिसत नाही. हमासने ओलीस ठेवलेल्या आणखी पाच नागरिकांची मंगळवारी सुटका केली. या दहशतवादी संघटनेने 240 जणांना डांबून ठेवले आहे.
भारताचं कॅनडाला समर्थन
▪️इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला दोन तृतीयांश मत मिळाली आणि तो पारित करण्यात आला. दुसरीकडे या प्रस्तावाला 120 मतदान झालं ज्यामध्ये 14 मत या प्रस्तावाच्या विरोधात होती. तर 45 देशांची या सभेला हजेरी नव्हती त्यात भारत देखील होता. दरम्यान भारत या सभेला हजर नव्हता याचं कारण सांगण्यात येत आहे की, या प्रस्तामामध्ये हमासने इस्त्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा कोणताही उल्लेख नव्हता. तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, जपान, युक्रेन आणि इंग्लंड हे देश देखील भारताप्रमाणे या मतदानासाठी गैर हजर होते.