वाकेड घाटात दरड कोसळली…

Spread the love

लांजा  : तालुक्यातील वाकेड घाटात आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या दरडीसोबत संरक्षक भिंतीचाही भाग कोसळला, त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सध्या एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली असून प्रशासनाची यंत्रणा दरड हटवण्याचं काम वेगाने करत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
     

या प्रकारामुळे महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या कामांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संरक्षक भिंतीसह दरड कोसळणं ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून या रस्त्याची गुणवत्ता आणि देखभाल कार्यक्षमतेवर टीका होऊ लागली आहे.प्रशासनाकडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page