🛑 जनशक्तीचा दबाव न्यूज
🛑 (नवी मुंबई | जानेवारी २९, २०२३)
▪️ कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. ३०) मतदान होणार आहे. तर मतमोजणी गुरुवारी (दि.२ फेब्रुवारी) रोजी होणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनोज रानडे यांनी पत्रकातून दिली. कोकण विभाग शिक्षक मतदार संघात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचा समाविष्ट आहेत. २९ जानेवारी रोजी सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचारी मतदान साहित्यांसह मतदान केंद्रांवर रवाना होणार आहेत.
▪️ मतदान सोमवारी सकाळी ०८.०० ते दुपारी ०४.०० या वेळेत होणार आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट असलेल्या शिक्षक मतदारांनाच केवळ मतदान करता येणार आहे. मतमोजणी गुरुवारी (दि. २ फेब्रुवारी) सकाळी ८.०० पासून सुरु होईल. मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रांवर कोवीड-१९ च्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घेतली जाणार आहे.