विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी सोमवारी 30 तारखेला मतदान होत आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत शेकापचे उमेदवार विद्यमान आमदार बाळाराम पाटील विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेनेचे व भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत रंगली आहे. यावेळी शिंदे गट आणि भाजपची ताकद कोकणात एकवटल्याने यावेळी बाळाराम पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः ही जागा शिंदे गटाकडे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. रत्नागिरी शहरात मतदान होत असून बाळासाहेबांची शिवसेनेचे व भाजपा युतीचेउमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या जयस्तंभ येथे उभारण्यात आलेल्या बुथवर सकाळपासून उत्साह दिसत होता