
स्थानिक उत्पादकांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देणार,कोकण उत्पादित ४० स्टॉल चे मंत्रालयात लवकरच भरविणार प्रदर्शन….
कुडाळ/प्रतिनिधी:-“आत्मनिर्भर भारत” संकल्पनेला चालना देणारा ‘वोकल फॉर लोकल’ हा उपक्रम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत सुरू झाला महत्वकांक्षी उपक्रम आहे. स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देणे हा त्यामागचा हेतू आहे. या उपक्रमातून भारताला आर्थिक सुभत्तता आणि महासत्ता बनवण्याची ताकद आहे. असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी, कुडाळ महिला मोर्चा आयोजित “वोकल फॉर लोकल” सेवा पंधरावडा निमित्त स्थानिक बचत गट उत्पादित केलेल्या स्टॉलचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे फित कापून पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सेवा पंधरवडा कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा भाजपने कुडाळ येथे हे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्य पदार्थांचे प्रदर्शन झाले . यात तपस्या क्रियेशन पिंगुळी, किमया आयुर्वेदिक, माऊली बचत गट कालेली, स्वामी समर्थ परुळे, गायत्री आंबेगाळी, रामेश्वर कुडाळ, कोसंबी अणाव, तेजस्विनी नाबारवाडी , साई समूह पिंगुळी अशा सुमारे २० बचत गटांनी आपली उत्पादने प्रदर्शनात आणली होती. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सौ.श्वेता कोरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष राजू राऊळ, बंड्या सावंत, सौ. संध्या तेरसे , संजय वेगुर्लेकर, आरती पाटील. अदिती सावंत, मुक्ती परब, विजय कांबळी, गजानन वेगुर्लेकर आदी सह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, “भारतातील स्थानिक बाजारपेठेत एवढी क्षमता आहे की भविष्यात इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. आपण आत्मनिर्भरतेच्या दिशेने चाललो तर जगातील इतर राष्ट्रे भारताकडे महासत्ता म्हणून पाहतील. मात्र हे बोलणं जितकं सोपं आहे, तितकीच जबाबदारी आपल्यावरही मोठी आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला मंत्र सिंधुदुर्गात राबविला जात आहे.”
महिला मोर्चाच्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून सिंधुदुर्गातील लघुउद्योगांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे पालकमंत्री राणे यांनी सांगितले. “स्थानिक उत्पादकांना उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. मुंबईसह इतर मोठ्या बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार आहोत,” असेही स्पष्ट केले.
राणे म्हणाले, “पुढील दोन आठवड्यांत मंत्रालयामध्ये सिंधुदुर्गातील उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास ४० स्टॉल्स लावले जाणार आहेत. लघुउद्योगांना दर्जेदार बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे आणि पुढील पाच वर्षांत ती निश्चित पूर्ण करू.” असे आश्वासनही पालकमंत्री निदेश राणे यांनी दिले.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

