⏩ वेंगुर्ले/प्रतिनिधी:- विकासात्मक आढावा घेण्याच्या दृष्टीने भोगवे गावची पालकमंत्र्यांनी घेतली भेट *सर्व प्रथम भोगवे समुद्र किनारी बंधाऱ्याची केली पाहणी; तालुका भाजपा पदाधिकाऱ्यांकडून आणी परूळे-भोगवे मधील कार्यकर्त्यांकडून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले; तसेच भोगवे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, उपसरपंच आणी सदस्यांकडून त्यांचा विषेश स्वागत व सत्कार करण्यात आला.
▶️ श्री निलेशजी सामंत(माजी सभापती तथा जिल्हा चिटणीस भाजपा ) यांनी गावातील अविकसित आणी रखडलेल्या काही बाबी मांडत त्यांना चालना मिळण्याबाबत पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दीले. त्यानंतर तालुका भाजपा पदाधिकारी भोगवे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांच्यासह विकासात्मक विषयांवर चर्चा केली त्या दृष्टीने भोगवे नेवाळी बंधारा पाहणी केली. 1)लोकांच्या मागणीनुसार जिओ ट्यूब ऐवजी दगडाचा बंधारा करण्याचा प्रयत्न करणार.2) निवती किल्ला विकासासाठी 65 कोटी निधी mtdc मार्फत देणार.3)भोगवे आणी शेळपी गावातले सर्व रस्ते करणार विकासाला चालना देण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांनी स्विकारली
▶️ यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. राजन तेली जिल्हा चिटणीस भाजपा तथा माजी सभापती श्री. निलेश सामंत जिल्हा सरचिटणीस भाजपा श्री. प्रसन्ना देसाई, कुशेवाडा सरपंच श्री. निलेश सामंत , भाजप युमो तालुकाध्यक्ष श्री. प्रसाद पाटकर, भोगवे सरपंच सौ. अंकीता वायंगणकर, उपसरपंच श्री रूपेश मुंडये, ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच सुनील राऊत, ग्रा. पं सदस्य श्री सखाराम केसरकर, ग्रा.पं सदस्या सौ. राजश्री कोळंबकर, सौ. आरती कोळंबकर, सौ. उल्का कोळंबकर, माजी पंचायत समिती सदस्या सौ. प्रणाली बंगे, भोगवे तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गावडे, श्री. रूपेश राणे, श्री. शिवराम कोळंबकर, श्री. संकेत केळुसकर, श्री. पुंडलिक कोळंबकर, श्री. संजय सामंत, प्रसाद खुळे, मंदार सामंत, उद्देश कोळंबकर, उल्हास कोळंबकर व इतर भोगवे गावातील स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.