अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडून डॉ. आंबेडकर वाचनालयाला पुस्तके भेट…

Spread the love

चिपळूण: सुप्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे सदस्य मकरंद अनासपुरे, जे रत्नागिरी जिल्ह्याचे जावई देखील आहेत, यांनी आपल्या पुस्तक वाचनाच्या छंदानुसार चिपळूण येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला एक महत्त्वाची भेट दिली. त्यांच्या संग्रहात असलेल्या अनेक पुस्तकांमध्ये काही पुस्तके त्यांनी विद्यार्थ्यांसाठी व वाचनालयाच्या उपयोगासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
या इच्छेचे पालन करत, मकरंद अनासपुरे यांच्या सहकारी श्री. समीर जानवलकर यांनी चिपळूणच्या रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात या पुस्तिका देणगी म्हणून सुपुर्द केली. या भेटीचा कार्यक्रम एका छोटेखानी समारंभाच्या स्वरूपात आयोजित केला गेला होता.
कार्यक्रमात वाचनालयाचे कार्याध्यक्ष श्री. सुनीलजी खेडेकर यांनी प्रास्ताविक केले. वाचनालयाचे अध्यक्ष श्री. राष्ट्रपालजी सावंत यांनी पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी सन्माननीय श्री. राजेश्वर देशपांडे सर व मकरंद अनासपुरे यांच्यासह श्री. समीर जानवलकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

वाचनालयाच्या वतीने आभार व्यक्त करत, वाचनालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षी मकरंद अनासपुरे यांना पुन्हा भेट देण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. या समारंभात वाचनालयाचे कार्यवाह सुमेध करमरकर, संचालक प्रदीप पवार, मंजूषा चितळे, सल्लागार विनायक ओक, बाळकृष्ण चव्हाण, ग्रंथपाल तेजश्री सोमण व कर्मचारी उपस्थित होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page