*खेड /प्रतिनिधी-* चिपळूण ते पंधरा गाव रस्त्यावरती प्रचंड खड्डे पडले होते. गणेशोत्सवाच्या सणाला रस्त्यावर खड्डे असल्याने मुसाड गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला. गणेश उत्सव साठी येणार्या चाकरमनीसाठी खड्यांचा प्रवास होऊ नये म्हणून , मुसाड ग्रामस्थांनी एकत्र येऊन चिपळूण व पंधरा गाव ला जोडणारा मुख्य रस्त्या च्या पडलले खड्डे बुजवून श्रमदान केले . काम करण्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात माजी सरपंच लक्ष्मण सुर्वे तसेच माजी सरपंच सहदेव पोसनाक , तंटामुक्ती अध्यक्ष विजय शिंदे यांनी व आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.
सदर रस्ता करण्यासाठी ग्रामस्थांची मागणी होते सदरचा रस्ता मंजूर असून गणपती नंतर रस्ता करण्यात येणार आहे. सदरच्या रस्त्याला निधी मंजूर असून मात्र खड्डे भरण्याचे काम करण्यात आले होते. मुसाड गावच्या ग्रामस्थांनी एक आदर्श काम केले आहे. स्वखर्चाने खड्डे भरण्याचे काम करून एक नवीन पद्धत इतर गावांसमोर आदर्श ठेवला आहे