रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामस्थ व मुंबईकर यांनी एकत्र येऊन भ्रष्टाचार मुक्त संस्था स्थापन केली ; पहा सविस्तर

Spread the love

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील तालुका पातळीवर गावांमध्ये ग्रामपंचायत मध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचाच एम्पॅक्ट म्हणुन ग्रामसेवक,सरकारी अधिकारी,सरपंच यांच्या संगनमताने चालत असलेले भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आज संगमेश्वर तालुक्यातील मुचरी, मौजे असुर्डे आणि कोळंबे सोनगिरी या गावातील स्थानिक ग्रामस्थ व मुंबईकर यांनी पुढाकार घेऊन संगमेश्वर तालुका भ्रष्टाचार निर्मुलन संस्था स्थापन केली आहे, सध्या तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार होताना आपल्याला बघायला मिळत आहेत, आणि त्यामुळे गावातील सर्वसामान्य लोकांवर अन्याय होताना आपल्याला बघायला मिळतो या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ही संस्था स्थापन करत आहोत असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सदर संस्थेची कार्यकारिणी जाहीर झालेली केली आहे,

अध्यक्ष – श्री.मनोहर मुंडेकर , उपाध्यक्ष – श्री.विलास सुर्वे , सचिव – श्श्री. बाळकृष्ण महाडिक, उपसचिव – श्री.मंगेश पाताडे, खजिनदार – खंडेश कासार , सह खजिनदार – प्रणाली प्रदीप शिंदे, शोभा नरेश गवळी, सल्लागार – श्री.महेश रसाळ , श्री.प्रदीप मोहिते, सदस्य- इम्रान झारी,श्री. सखाराम जोशी, श्री.राजेंद्र टाकळे, श्री.अशोक तांबे,श्री.प्रदीप शिंदे,श्री. सुरेश महाडिक, श्री.संतोष नागलेकर, श्री.नरेश गवळी,
श्री. महेंद्र महाडिक, श्री.विनेश टाकळे, श्री. निलेश भालेकर,
श्री.अनंत पडवळ.श्री.किशोर जाधव. म्हणून काम पाहतील.
तसेच रत्नागिरी तालुक्यातील सरकारी व निमसरकारी तसेच ग्रामपंचायत कार्यालयात होत असणारे भ्रष्टाचार त्याची पाळमुळं खणून काढण्यासाठी ही संस्था सदैव कटिबद्ध असेल असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच तालुक्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत असेल तरी कृपया संस्थेमध्ये समाविष्ट होण्याचं आवाहन या संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.

जनशक्तीचा दबाव प्रतिनिधी श्री.प्रणील पडवळ – +918779014072

जनशक्तीचा दबाव वि.प्रतिनिधी श्री.निलेश पांडुरंग घाग – +919619105773

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page