
संगमेश्वर : अर्चिता कोकाटे/नावडी- ” मिसळून पाण्यात भक्तीचा रंग, पाण्याखाली साकारला विठूच्या संग ” मूळचे चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे गावचे व सध्या स्थायिक असलेले देवरुख येथील रंगकला व हस्तकला रांगोळी इत्यादी उत्कृष्ट कला अवगत केलेले, सुप्रसिद्ध कलाकार विलास रहाटे यांनी पंढरीची वारी आषाढी एकादशी निमित्त अवचित साधून पाण्याखाली विठुरायाची रांगोळी साकारली आहे.
सध्या गणपतीच्या रेखणीच्या कामात जिल्हाभरात व्यस्त असताना भारतीय सण व संस्कृतीची जपणूक म्हणून जुनी पितळेची परात घेऊन नदीच्या पाण्यात रांगोळीचे रंग घेऊन पाऊण ते एक तासांमध्ये विठुरायाची रांगोळी साकारली आहे.
विलास विजय रहाटे यांनी गेल्या काही वर्षांत नवनवीन कला जोपासल्या आहेत. त्यांच्या या कलेचे सर्वत्र कौतुक होताना दिसते. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना विलास रहाटे म्हणाले पाणी नसल्यास ही रांगोळी अर्ध्या तासात तयार करता येते.