देवरुखमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्राताई चव्हाण यांचे भव्य स्वागत…

Spread the love

तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली स्वागत सोहळा संपन्न; भाजप पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

देवरुख (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्राताई चव्हाण यांचे देवरुख येथे भव्य स्वागत करण्यात आले. हा स्वागत समारंभ भाजप तालुका अध्यक्ष रुपेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाला भाजपचे विविध विभागातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये उपनगराध्यक्ष अभिजीत शेटे, माजी शहर मंडळ अध्यक्ष श्रीराम शिंदे, माजी नगरसेवक परिमल भोसले, माजी युवक शहर अध्यक्ष संदीप भिसे, तसेच कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद कदम, ज्येष्ठ पदाधिकारी विनोद सुर्वे, शहर उपाध्यक्ष महेश कांबळे, निखिल रतावा, एकनाथजी सहस्रबुद्धे, जिल्हा सरचिटणीस श्रद्धाताई कदम, यांचा समावेश होता.

तसेच विवेक गोखले, संदेश भालेकर, भरत परब, अविनाश सावर्डेकर, शुभम खंडजोडे आणि इतर अनेक कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. सौ. चित्राताई चव्हाण यांचे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ व सत्कारपत्र देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. त्यांच्या आगमनाने परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रसंगी सौ. चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत महिला मोर्चाच्या आगामी योजनांची माहिती दिली आणि संघटनात्मक बळकटीसाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन केले.

कार्यक्रमाची सांगता “भारत माता की जय” व “भाजप विजय असो” च्या घोषणांनी करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमात उत्साह, एकजूट आणि संघटनशक्तीचे दर्शन घडले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page